शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

खड्डा दाखवा, हजार रु.मिळवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2016 1:48 AM

येत्या १५ डिसेंबरनंतर राज्यातील रस्त्यावर एकही खड्डा दिसणार नाही. ‘एक खड्डा दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा,’ असे सरकारचे आव्हान असेल असे सार्वजनिक बांधकाम

मुंबई : येत्या १५ डिसेंबरनंतर राज्यातील रस्त्यावर एकही खड्डा दिसणार नाही. ‘एक खड्डा दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा,’ असे सरकारचे आव्हान असेल असे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी सांगितले. लोकमतशी बोलताना ते म्हणाले की, बांधकाम खात्याच्या अखत्यारित ८६ हजार किलोमीटरचे रस्ते आहेत. त्यातील १५ हजार किमीचे रस्ते आता राष्ट्रीय महामार्गाचा भाग बनणार आहेत. उर्वरित रस्त्यांवरील खड्डे १५ डिसेंबरपर्यंत बुजविण्यात येतील. गेल्या दोन वर्षात नवे रस्ते आणि रस्ता दुरुस्तीवर १६ हजार कोटी रुपये खर्चाची कामे सुरू करण्यात आली, पण रस्त्यांची कामे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये करण्यात आल्याने भरीव कामे दिसत नाहीत. त्यामुळे आता किमान १०० किलोमीटरचे सलग रस्ते बांधण्याचे ठरले आहे. प्रत्येक तालुक्याचा रस्ते विकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. बांधकाम खात्याच्या अखत्यारितील रस्ते बांधताना कंत्राटदाराला दोन वर्षांत कामे पूर्ण करावी लागतील. त्या पोटी दोन वर्षांनंतर त्यांना ४० टक्के पैसा दिला जाईल. उर्वरित ६० टक्के पैसा हा त्यानंतरच्या आठ वर्षांनी दिला जाईल. या ‘अ‍ॅन्युइटी’ योजनेमुळे रस्त्यांच्या देखभाल, दुरुस्तीची जबाबदारीदेखील निश्चित होईल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. राज्यातील रस्त्यांसाठी नाबार्डकडून दरवर्षी साधारणत: साडेसातशे कोटी रुपये मिळतात. यंदा राज्य सरकारची मागणी मान्य करीत एक हजार कोटी रुपये चार दिवसांपूर्वीच नाबार्डने दिले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)