मुंबई - विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. हेलिकॉप्टरने शेतात जाणारा दुसरा मुख्यमंत्री दाखवा आणि एक लाख रुपये दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस मिळवला, असा टोमणा मला मारला. आता मी म्हणतो अडीच वर्ष बाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा आणि बक्षीस मिळवा, अशी टीका एकनाथ शिंदे
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, शेतकऱ्यांची सुद्धा हेलिकॉप्टरने फिरले पाहिजे. तालुक्या तालुक्यामध्ये हेलिपॅड करायचे आहे. त्याचं कारण म्हणजे कुणाला कधी आरोग्याचा प्रश्न झाला. तर त्याला एअर अॅम्ब्युलन्सने आणता आलं पाहिजे, हा आमचा हेतू आहे. मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने कसा शेतीवर जातो, असं म्हणून मला हिणवलं. हेलिकॉप्टरने शेतात जाणारा दुसरा मुख्यमंत्री दाखवा आणि एक लाख रुपये दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस मिळवला, असा टोमणा मला मारला. आता मी म्हणतो अडीच वर्ष बाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा आणि बक्षीस मिळवा. हे बक्षीस वाचावं म्हणून आम्ही हा मुख्यमंत्रीच बदलून टाकला. सरकार बदललं, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.
माणूस चुकतो तेव्हा चूक सुधारतो, तो त्याच्या मनाचा मोठेपणा असतो. पण मीच बरोबर बाकीचे चूक असं कसं होऊ शकतं. एक माणूस चुकेल, दोन माणसं चुकतील, पण पन्नास माणसं कशी चुकू शकतात, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी लगावला. तसेच आम्ही रेशीमबागेत गेलो, गोविंदबागेत नाही, असे म्हणत त्यांनी निशाणा साधला.
दरम्यान, अंधश्रद्धा अनिष्ट प्रथांवरूनही एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. प्रबोधनकार ठाकरेंनी अनिष्ट प्रथांना नेहमीच विरोध केला. मात्र त्यांचे वारसदार मात्र लिंबाटिंबाची भाषा करत आहेत. आमला आठवतेय की, आम्ही वर्षा बंगल्यावर नंतर गेलो. मात्र तिथे गेलो तेव्हा आम्हाला पाटीभर लिंबू सापडली. वेगवेगळ्या प्रकारची लिंबू होती. अशा लिंबूटिंबूची भाषा करणाऱ्यांनी बाळासाहेबांच्याच नाही तर प्रबोधनकारांच्या विचारांनाही तिलांजली दिली आहे, अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली.