शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

१८ लाख बैल करतात रोज श्रमदान!

By admin | Published: September 01, 2016 2:37 AM

बैलांच्या खांद्यावर कृषिक्षेत्राची भिस्त

नीलेश शहाकारबुलडाणा, दि. ३१ : आज आधुनिक शेतीबद्दल बरेच बोलले जात असले, तरी शेतकर्‍यांच्या कुटुंबाचा परीघ बैलजोडीशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळेच या यंत्रयुगातही १८ लाख बैलांच्या खांद्यावरच कृषिक्षेत्राची भिस्त आहे.आपल्या शेतीप्रधान देशात बैल हाच शेतीचा प्रमुख घटक मानला जातो. शेतीच्या कामासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या बैलांना अगदी पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. अपार श्रम करणार्‍या या मुक्या जनावराची शासनाकडूनही नोंदणी ठेवली जाते. पशुगणना अहवालानुसार राज्यात ७६ लाख ३0 हजार ९२0 बैल असताना केवळ ५४ लाख बैल शेतातील कामासाठी जुंपल्या जातात. मशागतीचे क्षेत्र कमी झाल्याने बैलजोडी सांभाळणे परवडत नाही. वर्षातून दोनवेळा मशागत करण्यासाठी रोटावेटर, लहान ट्रॅक्टरचा वापर करणे सोईस्कर होऊ लागले आहे. त्यासाठी ५0 हजारांची बैलजोडी वर्षभर सांभाळणे आर्थिकदृष्ट्या बेहिशेबी वाटत असल्याने शेतकरी मोठय़ा प्रमाणात यांत्रिकीकरणाकडे वळला आहे. मात्र या मुक्या जनावराशी असलेले जिवाशिवाचे नाते तो तोडू शकला नाही.चार लाख बैलांचा वाहतुकीसाठी वापरराज्यातील एकूण बैलापैकी १ लाख ७३ हजार ४९५ बैल प्रजोत्पादनासाठी वापरले जातात, तर ४ लाख १९ हजार १३४ बैलांचा केवळ बैलगाडीला जुंपून वाहतूक करण्यासाठी वापर केला जातो. ८७ हजार ३८८ बैल मोकाट असल्याची नोंद आहे. विदर्भातील अकरा जिल्ह्यांत २७ लाख १७ हजार बैलांची नोंदणी आहे. यापैकी १७ लाख ९९ हजार बैलांचा शेतीसाठी वापर केला जात आहे.जिल्हा           एकूण बैल               कृषीसाठी वापरअकोला           १,५२,७८२                  १,0१४८२अमरावती        २,५३,८९0                १,७२,५६६भंडारा             १,२९,६१६                   ९२,0७९बुलडाणा          ३,0४,५00                २,0६,११८चंद्रपूर           ३,४३,९७५                 २,४१,७९0गडचिरोली      ३,६६,९३८                २,२२,५५0गोंदिया         २,२६,८११                    १,६२,९0२नागपूर         २,४५,८३४                    १,७३,९१७वर्धा             १,५४,९३६                     १,0७,२१८वाशिम           १,६८,८३७                  १,११,१0७यवतमाळ         ३,६८,९६0                 २,0७,७00