शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

श्रीपाद छिंदम तृतीय पंथीयाच्या रूपात, शिवजयंतीनिमित्त कल्याणमध्ये देखावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2018 1:48 PM

छिंदमला तृतीय पंथीयाच्या रुपात दाखविण्यात आले आहे. कानात डूल, नाकात नथ, ओठाला लिपस्टिक, गळ्यात चपलांचा हार घालण्यात आला आहे, असे त्याचे चित्र कटआऊटद्वारे रंगविण्यात आले आहे.

कल्याण : तिथीप्रमाणे साज-या करण्यात येणा-या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनानिमित्त कल्याण पश्चिमेतील रामबाग शिवसेना शाखेच्या वतीने वादग्रस्त देखावा उभारण्यात आला आहे. या देखाव्याला पोलिसांनी हरकत घेतली आहे. हा देखावा काढून टाकण्याची नोटीस पोलिसांनी रामबागे शिवसेना शाखेला बजावली आहे.अहमदनगर महापालिकेतील भाजपाचे माजी उपमहापौर छिंदम यानं शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ त्याचे कटआऊट शिवसेना शाखेच्या वतीने लावण्यात आले आहेत. छिंदम याला तृतीय पंथीयाच्या रुपात दाखविण्यात आले आहे. कानात डूल, नाकात नथ, ओठाला लिपस्टिक, गळ्यात चपलांचा हार घालण्यात आला आहे, असे त्यांचे चित्र कटआऊटद्वारे रंगविण्यात आले आहे. भारताविषयी अनुद्गार काढणारे काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांना एका पाकिस्तानी मुजरा नर्तकीच्या रुपात दाखविण्यात आले होते. याशिवाय सीमेवर लढणा-या सैनिकांच्या कुटुंबीयांविषयी अश्लाघ्य उद्गार काढणारे भाजपा आमदार प्रशांत परिचारक, भाजपाचे खासदार नेपाल सिंह यांच्याचेही धिंडवडे कटआऊटद्वारे काढण्यात आलेले आहेत. मणिशंकर अय्यर सोडले तर उर्वरित सगळी मंडळी भाजपाची आहे. ज्यांनी त्यांच्या अकलेचे तारे तोडले आहेत. याशिवाय शिवप्रतापाची कट आऊट दाखविण्यात आलेली आहेत. शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा कोतळा बाहेर काढला हे कट आऊट लावण्यात आलेले आहे. रामबागेच्या शाखेने हा वादग्रस्त देखावा उभारल्याचे कळताच महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रामबाग शाखेला पोलिसांनी नोटीस बजावली असून देखाव्याविषयी हरकत घेतली आहे. वादग्रस्त देखावा तात्काळ काढून टाकण्यात यावा, असे नोटिशीमध्ये नमूद करण्यात आलेले आहे. या देखाव्यात व्यक्ती ही भाजपाच्या असून भाजपावर रामबाग शाखेने निशाणा साधल्याने पोलिसांनी ही नोटीस बजावल्याचे रामबाग शाखेचे म्हणणे आहे.

टॅग्स :Shripad Chindamश्रीपाद छिंदमShivaji Jayanti 2018शिवजयंती २०१८Shiv Senaशिवसेनाkalyanकल्याण