ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - स्वतंत्र विदर्भा पाठोपाठ स्वतंत्र मराठवाडयाची मागणी करणारे राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांची पदावरुन गच्छंती अटळ समजली जात आहे. विधानसभेच्या कामकाजात सोमवारी अणेंच्या वक्तव्याचे जोरदार पडसाद उमटले.
आधीच आक्रमक झालेल्या शिवसेनेबरोबर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनेही अणेंच्या स्वतंत्र मराठवाडयाच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला. अणेंच्या वक्तव्यावरुन झालेल्या गदारोळामुळे विधानसभेच कामकाज दिवसभरासाठी तहकूब कराव लागल आहे.
अणेंच्या वक्तव्याशी सरकार सहमत नसल्याचं महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सभागृहात स्पष्ट केलं आहे.मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: याबाबत निवेदन देणार आहेत. त्यामुळे श्रीहरी अणे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वाढली आहे.