गजानन कलोरे / शेगाव (जि. बुलडाणा)शेगावीचा राणा माहेरी निघाला।सर्व संतमेळा भजनी रंगला।।लाख लाख कंठामधुनी गजाननाचे भजन।चंद्रभागा हर्षुनी जाई गजानन गजानन।।गण गण गणात बोते.व हरिनामाचा जयघोष करीत शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांची पालखी शनिवारी सकाळी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. यावेळी श्रींच्या रजत मुखवट्याची संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील व विश्वस्त नीळकंठ पाटील आदी मान्यवरांनी विधिवत पूजा केली.आषाढी एकादशीसाठी श्रींची पालखी दरवर्षी पंढरपूरला जाते. गत ४९ वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी ही पालखी निघणार असल्याने मंदिर परिसरातील भाविकांची पहाटेपासूनच गर्दी झाली होती. संस्थाननचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते रजत मुखवट्याची पूजा करण्यात आल्यानंतर पालखी मार्गस्थ झाली. याप्रसंगी संस्थानचे अध्यक्ष डॉ.आर.सी. डांगरा, कार्यकारी विश्वस्त नीळकंठ पाटील, किशोर टाक, नारायणराव पाटील, त्रिकाळ, अशोक देशमुख, शरद शिंदे, गोविंद कलोरे, राजेंद्र शेगोकार, पंकज शितुत आदी मान्यवर उपस्थित होते. श्रींची पालखी संस्थानच्या प्रांगणातून श्री नागदेवता मंदिर, श्रींचे सेवक वै. बाळाभाऊ महाराज, वै. नारायण महाराज यांच्या मंदिराजवळून निघाली. त्यानंतर महाप्रसाद भवन, तेलीपुरा मार्गे श्रींचे प्रगटस्थळी आल्यानंतर मधुकर घाटोळ, एम.पी. पाटील यांच्यावतीने वारकर्यांना फराळ देण्यात आला. नागझरी मार्गावर युवराज देशमुख, अशोक देशमुख यांच्या वतीने चहा देण्यात आला. सावित्रीबाई फुले पतसंस्थेच्यावतीने वारकर्यांना शरबत देण्यात आले. पालखीसोबत ७00 वारकरी असून, पाण्याचे टँकर, दोन रुग्णवाहिका, पावसाळी साहित्य देण्यात आले आहे. श्रींची पालखीचा दुपारचा मुक्काम श्री क्षेत्र नागझरी व रात्री मुक्काम पारसला आहे. १२ जून गायगाव-भौरद, १३ व १४ ला अकोला श्रींची पालखी जात आहे, असे प्रत्येक गावाला भेटी देऊन श्रींची पालखी १३ जुलैला श्री क्षेत्र पंढरपूरला पोहचत आहे.
श्रींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
By admin | Published: June 12, 2016 2:36 AM