शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
3
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
4
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
5
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
7
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
8
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
9
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
10
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
11
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
12
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
13
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
14
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
15
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
16
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
17
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
18
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
19
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
20
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा

तळावासीयांचे श्रद्धास्थान श्री चंडिका देवी

By admin | Published: October 08, 2016 2:21 AM

संपूर्ण तळावासीय नागरिकांचे श्रद्धास्थान तसेच ग्रामदैवत श्री चंडिका देवीचा नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा करीत आहेत.

तळा : संपूर्ण तळावासीय नागरिकांचे श्रद्धास्थान तसेच ग्रामदैवत श्री चंडिका देवीचा नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा करीत आहेत. जवळपास २०० वर्षांपेक्षा अधिक काळापासून या उत्सवाची परंपरा आहे. भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला श्री चंडिका देवीच्या मंदिरात घटस्थापना करून देवीची षोडोपचारे पूजा करून देवीचा घट बसविला जातोे. या पहिल्या दिवशी गावातील बारा वाड्यातील ग्रामस्थ भक्तिमय वातावरणात वाजतगाजत ज्ञानोबा माऊली तुकारामाचा गजर करीत आपआपल्या वाडीवरील दिंडी घेवून येतात. या दहा दिवसांत रायगड जिल्ह्यासह ठाणे, मुंबई, पुणे, कल्याण, डोंबिवली, चिपळूण आदि ठिकाणावरून देखील भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. या देवस्थानचे अठरा वतनदार आहेत. ते सर्व वतनदार या कार्यक्रमप्रसंगी उपस्थित असतात. त्याचबरोबर आपआपली जबाबदारी व कामे व्यवस्थित पार पाडीत असतात. मुख्य वतनदाराच्या हस्ते श्री देवीची पूजा केली जाते. ज्याचे साल असते ते सालकरी सेवक देखील यथासांग श्री देवीची पूजा करतात. गुरव हे या देवीचे खरे पुजारी आहेत. येथे नवरात्रौत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो. अठरा वतनदार आपली कामे करताना कुंभार घटाची माती घेवून येतात. बुरुड दोन परड्या, पंखा घेवून येतो, पानसरे गावातील वाण्याच्या दुकानातून अठरा प्रकारची धान्ये व अखंड दीपासाठी तेल घेवून येतो, यजमान पूजा साहित्य घेवून येतो, मंत्र जागरात घटाची स्थापना होते. पानसरे खायची पाने घटासाठी आणतो. घटाभोवती मातीत अठरा धान्ये पेरली जातात. घटामध्ये पाणी टाकून त्यावर परडी ठेवली जाते. शिंप्याने आणलेले कापड परडीवर ठेवल्यावर त्यावर नारळ ठेवला जातो. नंतर तिळाच्या फुलांची माळ चढविली जाते. मांग दररोज गोंधळाची कवने गातो. घटावर दररोज तिळाच्या फुलांची माळ चढविली जाते. नवरात्रांत देवीला दररोज वेगवेगळ्या रंगाची वस्त्रे व दागिने चढविले जातात. तसेच फुलांनी सजविले जाते. मंदिरात दररोज भाविकांची विशेषत: महिलावर्गाची दर्शनासाठी प्रचंड गर्दी असते. ही देवी जागृत देवस्थान आहे. श्री चंडिका देवी ही जागृत देवी असल्याचे मानले जाते. (वार्ताहर)