रिसोड: दोन जिवांचे अतुट संबंध जोडणारा विवाह सोहळा अनेकांना कर्जाच्या खाईत लोटणारा ठरतो. शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने शुभमंगल कन्यादान योजना सुरु केलेली आहे. पण २0१३-२0१४ यावर्षात तालुक्यामध्ये एकाही सामाजिक नोंदणीकृत संस्थेद्वारा सामुहिक विवाह सोहळय़ाचे आयोजन केले नाही. यामुळे या शुभमंगल कन्यादान योजनेस रिसोड तालुक्यात ब्रेक लागले असल्याचे दिसून येत आहे. सामाजिक न्याय विभागांतर्गत समाजकल्याण अधिकार्यामार्फत तर महिला बालकल्याण विकास विभागाअंतर्गत महिला बालविकास अधिकार्यामार्फत कन्यादान योजना राबविण्याची व्यवस्था आहे. शासनाच्या वतीने विवाह सोहळय़ातील कागदपत्राची पुर्तता करणार्या प्रत्येकी जोडप्यास १0 हजार रुपयाचे अनुदान देण्यात येते तसेच शुभमंगल सोहळय़ाचे आयोजन करणार्या सामाजिक संस्थेस जोडप्यामागे दोन हजार रुपयाचे अनुदान देण्याची तरतूद आहे. या सामुहिक सोहळय़ाकरीता जोडप्यांची र्मयादा दिली आहे. मागील वर्षी तालुक्यात १५१ जोडप्यांचे सामुहिक विवाहसोहळय़ांमध्ये शुभमंगल पार पडले. त्या जोडप्यांना या योजनेचा लाभ मिळाला. प्रत्येक गावातून तीन ते चार विवाहसोहळा होतात. तालुक्यातील ९८ गावांमध्ये सरासरी तीन ते चार हजार शुभमंगल विवाह सोहळे होतात. कन्यादान योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे सादर करण्याची प्रक्रिया अतिशय क्लिष्ट असल्यामुळे सामाजिक संस्था पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे योजनेस तालुक्यात खो मिळाला आहे.
शुभमंगल योजनेस रिसोड तालुक्यात खो
By admin | Published: May 14, 2014 10:30 PM