शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; चंद्रशेखर बावनकुळेंविरोधातील उमेदवार ठरला
2
बाबा सिद्दीकींच्या मतदारसंघातून लॉरेन्स बिश्नोई लढणार? या पक्षाने निवडणूक आयोगाकडे मागितले एबी फॉर्म
3
बाळासाहेब थोरातांच्या कन्येबद्दल वादग्रस्त वक्तव्य; सुजय विखे-पाटील यांना अटक करण्याची मागणी
4
कारखाना, पक्षांतर अन् बंडखोरी...इंदापुरात कोणते मुद्दे वाढवणार हर्षवर्धन पाटलांची डोकेदुखी?
5
सोलापूर जिल्ह्यात इच्छुकांचे टेन्शन वाढले: मविआसह महायुतीतही प्रचंड तिढा; कोणती जागा कोणाला सुटणार?
6
राज ठाकरेंनी आयात उमेदवार लादला; शिंदेंनी २०१९ ला तिसऱ्या क्रमांकाची मते घेणारा नेता फोडला
7
मनोज जरांगे-उदय सामंतांची पुन्हा भेट! राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण; सामंत म्हणाले...
8
वरळीतून मिलिंद देवरांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध; "आम्हाला स्थानिकच आमदार हवा..." चा नारा
9
न्यूझीलंडनं ५७ धावांत गमावल्या ५ विकेट्स! टीम इंडियासमोर ३५९ धावांचे आव्हान
10
Jio युजर्सना दिवाळी गिफ्ट! 3350 रुपयांचा मोफत लाभ, जाणून घ्या सविस्तर...
11
उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी आली; कणकवलीत नितेश राणेंविरोधात 'शॉकिंग' उमेदवार
12
"ताईचे पराक्रम..."; जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह विधान, सुजय विखे म्हणतात, "ते ऐकत नसल्याने..."
13
दिवाळीपूर्वी रमा एकादशी: व्रतपूजन कसे करावे? धन-वैभव-समृद्धी लाभ; पाहा, महत्त्व अन् मान्यता
14
Test Record : घरच्या मैदानात ३००+ धावांचा पाठलाग करताना कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
15
५ ग्रह गोचराने अद्भूत योग: ८ राशींचा भाग्योदय, सुख-समृद्धी; धनलाभ, लक्ष्मी-नारायण शुभ करतील!
16
Diwali Astro 2024: ही दिवाळी अडलेल्या कामांना गती आणि प्रगती देणारी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
केवळ १५ वर्षांत बनाल Millionaire, हा फॉर्म्युला वापरा; २५ व्या वर्षी गुंतवणूक कराल तर, ४० व्या वर्षी व्हाल मालामाल
18
"१९६७ ला माझ्या बापाने बंडखोरी केली, आमदार झाले; आम्ही काय बंडखोरीच करायची का..?"
19
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
20
'आमी जे तोमार'वर नृत्य करताना स्टेजवर कोसळली विद्या बालन, पुढे घडलं असं काही की सर्वांनी केलं कौतुक

सरपंचांचा लबाडीचा मार्ग बंद

By admin | Published: February 03, 2015 2:04 AM

सरपंचाने राजीनामा दिला तरी तो पंचायत समितीने मंजूर करण्याआधी ग्रामपंचायत बहुमताचा अविश्वास ठराव करून त्यास पदावरून दूर करू शकते,

मुंबई : सरपंचाने राजीनामा दिला तरी तो पंचायत समितीने मंजूर करण्याआधी ग्रामपंचायत बहुमताचा अविश्वास ठराव करून त्यास पदावरून दूर करू शकते, असा निकाल देऊन मुंबई उच्च न्यायालयाने बहुमताचा विश्वास गमावल्यानंतरही लबाडीने पदाला चिकटून राहण्याचा सरपंचांचा मार्ग बंद केला आहे.कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील तामदलगे ग्रामपंचायतीचे सरपंच चंद्रकांत बापुसाहेब रुग्गे यांची याचिका फेटाळताना न्या. एम.एस. सोनक यांनी हा निकाल दिला. परिमामी, अविश्वास ठराव मंजूर होऊनही गेली अडीच वर्षे पदावर राहिलेल्या रुग्गे यांना अखेर सरपंचपद सोडावे लागणार आहे.सरपंचाने अविश्वास ठरावासाठी सभा होण्याआधी राजीनामा दिला असला तरी एकदा अविश्वास ठराव मंजूर झाल्यावर पंचायत समितीकडून राजीनामा मंजूर होईपर्यंत थांबण्याची गरज नाही. अशा सरपंचाने अविश्वास ठरावानंतर नियमानुसार सात दिवसांत पद सोडणे बंधनकारक आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.अविश्वास ठराव येणार याची कुणकुण लागताच रुग्गे यांनी १७ आॅगस्ट २०१२ रोजी राजीनामा दिला. गट विकास अधिकाऱ्यांनी तो राजीनामा १० सप्टेंबरच्या सभेत विचार करण्यासाठी पंचायत समितीकडे पाठवून दिला. दरम्यान, ग्रामपंचायतीच्या एक तृतियांशाहून अधिक सदस्यांनी अविश्वास ठरावासाठी विशेष सभा घेण्याची नोटीस २३ आॅगस्ट रोजी दिली व त्यानुसार तहसीलदारांनी २९ आॅगस्ट २०१२ रोजी सभा घेतली. त्या सभेत ग्रामपंचायतीच्या ९पैकी ७ सदस्यांच्या बहुमताने अविश्वास ठराव मंजूर झाला. त्याविरुद्ध रुग्गे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे फिर्याद केली. ती अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी २ नोव्हेंबर १२ रोजी फेटाळली. लगेच आठवडाभरात रुग्गे त्याविरुद्ध हायकोर्टात आले व सुरुवातीस दिलेल्या ‘जैसे थे’ आदेशाच्या जोरावर गेली अडीच वर्षे पदावर कायम राहिले होते.या सुनावणीत रुग्गे यांच्यासाठी अ‍ॅड. विजय एम. थोरात व पूजा थोरात यांनी तर प्रतिवादींसाठी मनोज पाटील व वैशाली निंबाळकर या सरकारी वकिलांनी काम पाहिले. (विशेष प्रतिनिधी)च्पदाला चिकटून राहण्यासाठी रुग्गे यांनी केलेल्या क्लृप्त्यांवर ताशेरे मारताना न्यायालयाने म्हटले की, रुग्गे यांनी ग्रामपंचायतीत बहुमताचा विश्वास गमावला आहे, हे स्पष्ट आहे. तांत्रिक आणि चुकीच्या सबबी पुढे करून ते पदाला चिकटून राहू पाहात आहेत. त्यांचे वर्तन प्रामाणिकपणाचे व स्वच्छ नाही.च् ग्रामपंचायतीत आपल्यावर अविश्वास ठराव मंजूर होणार हे दिसताच त्यांनी राजीनामा दिला व ठराव मंजूर झाल्यावर त्यांनी राजीनामा मागे घेतला व ठरावाच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे फिर्याद दाखल केली. त्यांनी लावलेला नियमांचा अर्थ मान्य केला तर, अशा मार्गांचा अवलंब करून, विश्वास गमावलेला सरपंच दीर्घकाळ पदावर राहील. लोकशाही बहुमतावर चालत असल्याने तसे होणे लोकशाहीला मारक ठरेल.