ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा एकारात्रीत चलनातून बाद करण्याचा धाडसी निर्णय घेतल्यानंतर लोकांनी या निर्णयाचे स्वागत केले. मात्र ख-या अर्थाने आता या निर्णयाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. खात्यात बक्कळ पैसे असले तरी तीच रक्कम हातात पडत नसल्याने लोक अक्षरक्ष मेटाकुटीला आले आहेत.
भाजीपाला, फळे, औषधे, किरणामालाचे सामान घेण्यासाठी आवश्यक नोटा पाकिटात नसल्याने लोकांचे हाल सुरु आहेत. मंगळवारी रात्री पंतप्रधानांनी निर्णय जाहीर केल्यानंतर बुधवारी बँका बंद होत्या. आज दोन दिवसांनी एटीएम मशीन्स सुरु होणार होत्या. पण अजूनही एटीएमचे शटर बंद असल्याने लोकांचे हाल होत आहे.
काही एटीएममशीन्समधून अद्यापी जुन्या नोटा काढून घेण्यात आलेल्या नाहीत. एटीएम बंद असल्याने लोकांनी बँकांमध्ये गर्दी केली आहे. सर्वच बँकांच्या बाहेर रांगा लागल्याचे चित्र आहे. त्यात बँका आणि एटीएममधून रक्कम काढण्यावर निर्बंध असल्यामुळे लोकांच्या त्रासामध्ये अधिकच भर पडली आहे.
महाराष्ट्रासह देशभरात नागरिक पैशांसाठी वाट पाहत असताना भोपाळ, बंगळुरू, नवी दिल्ली येथेही नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मंगळवारी रात्री तातडीने ज्यांनी एटीएममधून पैसे काढले त्यांना त्या तुलनेत थोडया कमी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Maharashtra: People wait in long queues for the ATM to open in Sion, Mumbai. pic.twitter.com/8iEXXsvztQ
— ANI (@ANI_news) 11 November 2016
Long queue outside an ATM in Bengaluru #DeMonetisationpic.twitter.com/rSZTWIrc9v
— ANI (@ANI_news) 11 November 2016
In 2 km radius have checked all ATMs, none of them are working, don't know what to do: Bhopal resident #DeMonetisationpic.twitter.com/mnB7ggaS5o
— ANI (@ANI_news) 11 November 2016