शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
4
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
5
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
6
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
8
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
9
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
10
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
11
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
12
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
13
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
14
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
15
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
16
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
17
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

शटल सेवा सुरू होण्याचे संकेत

By admin | Published: June 27, 2016 2:07 AM

नेरळ-माथेरान मिनी ट्रेन ९ मे २०१६ रोजी अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली होती

माथेरान : नेरळ-माथेरान मिनी ट्रेन ९ मे २०१६ रोजी अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली होती. त्यावेळी माथेरान-अमन लॉज ही मिनी ट्रेनची शटल सेवा बंद देखील करण्यात आली होती. मात्र मागील दोन दिवसांपासून मिनी ट्रेन पुन्हा नॅरोगेज ट्रॅकवर येण्यासाठी रेल्वे प्रशासनाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. नेरळ लोकोचा कुर्ला येथे गेलेला कर्मचारी वर्ग पुन्हा नेरळ लोकोमध्ये रविवारपासून कार्यरत झाला असून, लवकरच मिनी ट्रेनची शटल सेवा सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत.मिनी ट्रेनचे प्रवासी डबे दोन वेळा घसरल्याने त्यामुळे ९ मे पासून मिनी ट्रेनची सेवा अनिश्चित काळासाठी बंद ठेवली होती. नेरळ-माथेरान मिनी ट्रेनच्या सेवेबरोबर अमन लॉज -माथेरान ही शटल सेवा देखील अनिश्चित काळासाठी बंद ठेवल्याने माथेरानच्या पर्यटन व्यवसायावर प्रचंड परिणाम झाला होता. त्यानंतर राजकीय पक्षांनी ही बाब लक्षात आणून दिल्याने रेल्वेमंत्र्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे मिनी ट्रेन बंद होणार नाही, असे जाहीर केले होते. त्यात महत्त्वाचे म्हणजे मिनी ट्रेनचा सर्व भार वाहणारा नेरळ लोको येथील ५२ कर्मचारीवर्ग यांना मे महिन्यात कुर्ला येथे हलविण्यत आला होता. त्यामुळे मिनी ट्रेनचे भवितव्य अंधारात होते.१५ जूननंतर दरवर्षी नेरळ - माथेरान मिनी ट्रेनची सेवा बंद केली जाते. त्या आधी मिनी ट्रेन सुरू न झाल्याने माथेरान-अमन लॉज या शटल सेवेबद्दल देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. दरवर्षी पावसाळ्यात मिनी ट्रेनची शटल सेवा सुरू असल्याने पर्यटक पावसाळ्यात माथेरानला येत असतात. मात्र काही दिवसांपूर्वी ट्रॅकची देखभाल करणाऱ्या पीडब्लूआय विभागाने मिनी ट्रेनचा नॅरोगेज ट्रॅक गाडी पावसाळ्यात सुरू ठेवण्यासाठी योग्य असल्याचे रेल्वेच्या पीडब्लूआयने मध्य रेल्वे प्रशासनास कळविले आहे. त्यानुसार २५ जून रोजी मध्य रेल्वेच्या कल्याण येथील काही अभियंत्यांनी नेरळ -माथेरान मिनी ट्रेनच्या ट्रॅकची पाहणी के ली. (वार्ताहर)पर्यटकांचा प्रतिसाद येत्या काही दिवसांत मिनी ट्रेनची माथेरान-अमन लॉज ही शटल सेवा पुन्हा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शटल सेवा गेल्या वर्षी पावसाळ्यात सुरू होती.अमन लॉज-माथेरान हे अंतर २.६ कि.मी. असून या सेवेला पर्यटकांचा मोठा प्रतिसाद आहे. मात्र ही मिनी ट्रेनची शटल सेवा चालविणारा पायलट स्टाफ अद्याप नेरळ येथे परत आलेला नाही. >महत्त्वाचे मुद्दे९ मे पासून मिनी ट्रेन बंदएकाच वेळी शटल सेवा आणि नेरळ-माथेरान सेवा बंदनेरळ लोकोमधील १० मे रोजी कुर्ला येथे पाठविलेले ५२ कर्मचारी परत बोलावलेनॅरोगेज मार्गावरील झाडे कापण्याचे काम सुरूपायलट स्टाफ परत आला नाही