शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

“राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार तीनच चेहरे आश्वासक; हे सरकार उलथवणे कर्तव्य”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 2:03 PM

Shyam Manav News: महाराष्ट्रातील महायुती सरकार उलथवून लावा, असे आवाहन करण्यात आले.

Shyam Manav News: महाराष्ट्रात आपल्यासमोर तीनच आश्वासक चेहरे आहेत. राहुल गांधी यांचे शब्द काँग्रेस पक्षात अंतिम असतात. उद्धव ठाकरे यांची बांधिलकी प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुरोगामी विचारांशी असून, त्यांच्याशी अनेक वेळेला संवाद झाला आहे. शरद पवार यांना आपण सर्व पन्नास वर्षांपासून ओळखतो. त्यांची वैचारिक भूमिका सर्वांना माहिती आहे. पक्ष फुटूनही ते भाजप समोर झुकलेले नाही, म्हणून आपण या तिघांवर विश्वास ठेऊ शकतो, असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी स्पष्टपणे सांगितले.

हे  शेठजी व भटजींचे सरकार आहे. हे शेठजींची संपत्ती वाढवणारे आणि गरिबांना आणि गरीब बनवणारे सरकार आहे. त्यामुळे सरकार केंद्राचे असो किंवा महाराष्ट्राचे, ते सरकार उलथवून लावणे आपले कर्तव्य आहे, असा एल्गार श्याम मानव यांनी केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील महायुती सरकार उलथवून लावा, असे सांगत श्याम मानव यांनी आपला पूर्ण पाठिंबा महाविकास आघाडीला जाहीर केला. ते एका कार्यक्रमात बोलत होते. 

आपण सर्व पुन्हा आंदोलन करायला मोकळे आहोत

महाविकास आघाडी सरकारने दिलेले आश्वासन पाळले नाही, तर आपण सर्व पुन्हा आंदोलन करायला मोकळे आहोत, असेही श्याम मानव यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अडकवण्यासाठी भाजपने गृहमंत्रिपदावर असलेल्या अनिल देशमुख यांना ऑफर दिली होती. मात्र देशमुख यांनी ती ऑफर न स्वीकारता १३ महिने तुरुंगात राहणे पसंत केले, असा मोठा दावा श्याम मानव यांनी केला होता. 

देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर

श्याम मानव यांनी केलेल्या टीकेचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच समाचार घेतला. श्याम मानव यांच्या वक्तव्याला उत्तर देताना हे ही सुपारीबाजाच्या नादी लागले का, असा सवाल विचारला. तसेच मी कुणाच्या नादी लागत नाही आणि माझ्या नादी लागाल तर सोडत नाही. अनिल देशमुखांच्या पक्षाच्या नेत्यांनीच त्यांच्याविरोधातील पुरावे दिले, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीshyam manavश्याम मानवMahayutiमहायुतीRahul Gandhiराहुल गांधीUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवार