राजन मंगरूळकर, परभणीपरभणी शहरातील ७२ वर्षांच्या निर्मलकुमार माणिकलाल कळमकर यांनी वयाच्या १५ व्या वर्षापासून कर्तृत्ववान व्यक्तीमत्वांच्या स्वाक्षऱ्या घेण्याचा छंद जोपासला़ आज त्यांच्याकडे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्यासह अटल बिहारी वाजेपयी या राजकीय दिग्गजांबरोबरच थोर साहित्यिक, कलावंतांच्या ३ हजार स्वाक्षरींचा संग्रह झाला आहे़ कळमकर यांनी अशाच कर्तृत्ववान व्यक्तींची दीड हजार नावे नोंद केली असून, त्यांच्या स्वाक्षरी मिळविण्यासाठी ते आजही प्रयत्नरत आहेत़ परभणी शहरातील शिवाजीनगर भागातील रहिवासी निर्मलकुमार कळमकर यांना १९६२मध्ये साहित्यिक पु़ल़ देशपांडे यांना भेटण्याचा योग आला़ यावेळी त्यांनी पु़लं़ची स्वाक्षरी आपल्या डायरीत घेतली आणि तेव्हापासून स्वाक्षरींचा हा प्रवास सुरू झाला़ कोणत्याही ठिकाणी एखादी नामवंत व्यक्ती येणार असेल तर त्या कार्यक्रमास उपस्थित राहून नामवंताला भेटून परिचय देत कळमकर स्वाक्षऱ्या जमा करतात़ या कामी त्यांना त्यांची पत्नी, तिन्ही मुलांचा मोठा हातभार लागला़रोज पाच पत्रे पाठविणे सुरू
- निर्मलकुमार कळमकर
अन सावरकरांची स्वाक्षरी मिळाली गीतकार सुधीर फडके १९६३ साली परभणीत आले असता निर्मलकुमार कळमकर यांनी त्यांची भेट घेतली़. सुधीर फडके यांची स्वाक्षरी घेतल्यावर त्यांना आपल्या छंदाची माहिती देऊन स्वातंत्र्यवीर वि़. दा़. सावरकर यांची भेट घेऊन स्वाक्षरी घेण्याची इच्छा बोलून दाखविली़. त्यावरून सुधीर फडके यांनी मुंबईत सावरकर यांची भेट घालून दिली़.