मुंबई : ओन्कोलॉजी उपचारांच्या दिशेने उल्लेखनीय पाऊल उचलत कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यातील प्रमुख ठिकाणी १८ कॅन्सर केअर सेंटर स्थापन करण्याबाबतची घोषणा केली. या अंतर्गत २०१७मध्ये गोंदिया, अकोला आणि सोलापूर येथे केंद्र सुरू होईल आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने उर्वरित केंद्र सुरू करण्यात येतील.कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयाच्या अध्यक्षा टीना अंबानी यांनी यासंदर्भात सांगितले की, या निमित्ताने दक्षिण आशियात प्रथमच ‘एज’ रेडीओ सर्जरी सिस्टीम दाखल करण्यात आली आहे. जागतिक तंत्रज्ञानाचा वापर करून कर्करोगाचे आव्हान पेलले जाईल. तर रुग्णालयाचे रेडीएशन ओन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. कौस्तुव तलपत्रा यांनी सांगितले की, कर्करोगावरील उपचारासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार आहे. विशेष म्हणजे रुग्णांना या उपचारांतर्गत खर्चावर नियंत्रण ठेवता येणार आहे. व्हेरिअन इंडियाचे वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक अशोक कक्कर यांनी सांगितले, रुग्णालयाने कर्करोगावरील उपचारासाठी घोषित केलेला कार्यक्रम उल्लेखनीय आहे. या कार्यक्रमामुळे राज्यात कर्करोगांच्या उपचारामध्ये लक्षणीय बदल होणार आहेत.
कर्करोग उपचारासाठी लक्षणीय गुंतवणूक
By admin | Published: September 09, 2016 3:35 AM