लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर (जि. सांगली) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी व राष्ट्रवादीचे आ. जयंत पाटील एकत्र येत असल्याचे संकेत बागणी जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणुकीतच मिळाले होते. मात्र पुन्हा एकत्र येण्यासाठी दोघे मुहूर्त शोधत आहेत का? असा सवाल कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत केला.मी लोकशाही मानणारा कार्यकर्ता आहे. वैचारिक संघर्षामध्ये चौकशी समिती नेमली जाते. मात्र ज्यांना व्यक्तिद्वेषाची लागण झाली आहे, त्यांना द्वेषातून निर्णय घेण्यासाठी त्रयस्थाची मदत घेण्याची गरजच काय?, असे ते म्हणाले. वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी कोणाकडे राजीनामा दिला, याची माहिती नाही. दिलेला राजीनामा मंजूर व्हावा, अशी अपेक्षा असेल तर हा राजीनामा मुख्यमंत्री अथवा राज्यपालांकडे द्यावा लागतो, असे ते म्हणाले.
शेट्टी-जयंतरावांच्या युतीचे आधीच मिळाले होते संकेत - सदाभाऊ खोत
By admin | Published: July 02, 2017 3:47 AM