नाशिक, दि. 18- तीन दिवसांच्या बंदनंतर लासलगाव वगळता जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोमवारी लिलाव सुरू झाला. उमराणे बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटल सर्वोच्च बाजारभाव १४०१ मिळाला. लिलाव सुरु होण्याआधी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मागील आठवड्यात गुरु वारी साठेबाजीच्या नावाखाली आयकर विभागाने जिल्ह्यातील प्रमुख बाजारसमितीतील कांदा व्यापाºयांकडे धाडी टाकल्याने कांदा व्यापाºयांकडून बंद पुकारला होता.त्यात उमराणे येथील व्यापारी खंडु देवरे यांचेकडेही आयकर विभागाने धाड टाकल्याने येथील व्यापारी असोसिएशनतर्फे माल निकाशी होत नसल्याचे कारण देत २५ सप्टेंबर पर्यंत लिलाव बंदचे निवेदन बाजार समितीला देण्यात आले होते. मात्र काल जिल्हाधिकारी व व्यापारी यांची बैठक होऊन बाजार समितीचे लिलाव पुर्ववत सुरु करण्याचे आदेश दिल्याने उमराणे बाजार समतिीचे लिलाव पुर्ववत सुरु झाले आहेत.लिलाव सुरु होतात की नाही याबद्दल शेतकरी वर्गात संभ्रम असल्याने सकाळच्या सत्रात कांदा आवक कमी होती.शिवाय भाव काय निघतात याबाबतही शंका होती. परंतु भाव समाधानकारक निघाल्याने लिलाव सुरळीत सुरु झाला आहे. बाजारभाव कमीतकमी ५०० रु पये,जास्तीत जास्त १४०१ रु पये तर सरासरी भाव १२०० रु पयांपर्यंत होते. दरम्यान, सकाळपासूनच देवळा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
काय आहे नेमके प्रकरण?जिल्ह्यात कांदा व्यापा-यांवर प्राप्तिकर विभागाने घातलेल्या धाडींचा शेतक-यांना फटका बसला आहे. या धाडसत्राच्या निषेधार्थ व्यापा-यांनी कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्यामुळे शुक्रवारी जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये व्यवहार बंद राहिले. मागील चार ते पाच दिवसांपासून कांद्याचे भाव कमी होत असतानाच गुरुवारच्या धाडसत्रामुळे भावातील घसरण अधिक वेगाने झाली.यामुळे कांदा उत्पादकांची चिंता वाढली आहे. गुरुवारी लिलाव झाले असले तरी येवला येथील व्यापा-यांनी शुक्रवार ( 15 सप्टेंबर ) व शनिवार (16 सप्टेंबर ) लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला लासलगाव येथे तर व्यापा-यांनी बेमुदत बंद पुकारल्याने शेतक-यांना त्याचा मोठा फटका बसला आहे. वर्षभरापासून गडगडणा-या कांदा दराने अलिकडेच उसळी घेत अल्पावधीत प्रतिक्विंटल अडीच हजारांचा टप्पा गाठला होता. भाव वाढल्याने शेतक-यांनी चाळीत साठविलेला कांदा बाजारात नेण्यास प्राधान्य दिले. शहरी भागात कांदा भावाची ओरड होऊ लागल्याने केंद्र शासनाने भाव नियंत्रित ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली.
सटाण्यात एकाच वेळी तीन छापेसटाण्यात आयकर विभागातील अधिका-यांच्या वेगवेगळ्या पथकाने एकाच वेळी तीन ठिकाणी छापे टाकल्याने व्यापा-यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. गुरुवारी (14 सप्टेंबर )सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास येथील कांदा व्यापारी वर्धमान लुंकड यांच्या नाशिक रोडवरील कांदा गुदाम, बाजार समिती आवारातील कार्यालय व निवासस्थानी छापे टाकले. छापेमारीनंतर दिवसभर तपासणी चालूच होती. या कारवाईमुळे खळबळ उडाली असून, काही कांदा व्यापा-यांनी खरेदी बंद ठेवली होती.