महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत, काँग्रेसचे एवढे आमदार फुटणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 11:46 AM2024-02-05T11:46:36+5:302024-02-05T11:49:02+5:30

Maharashtra Political Update: गेल्या काही काळापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठा भूकंप होऊन उलथापालथ होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता काँग्रेसमध्येही राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Signs of a political earthquake again in Maharashtra, will so many MLAs of Congress break up? The game will be held during the Rajya Sabha elections | महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत, काँग्रेसचे एवढे आमदार फुटणार?

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत, काँग्रेसचे एवढे आमदार फुटणार?

गेल्या काही काळापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठा भूकंप होऊन उलथापालथ होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता काँग्रेसमध्येही राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात असून, काँग्रेसचे १५ आमदार फुटून महायुतीसोबत जातील, असा दावा केला जात आहे. येत्या महिनाभरात या घडामोडी होतील, असा दावा केला जात आहे. 

सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार सध्या भारत जोडो न्याय यात्रेवर असलेले राहुल गांधी हे सध्या भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून देशभरात सरकार विरोधात वातावरणनिर्मिती केली जात आहे. ही यात्रा २० मार्च २०२४ रोजी मुंबईत समाप्त होणार आहे. ही भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात येत असतानाच काँग्रेसला धक्का देण्याचा महायुतीचा प्रयत्न असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीदरम्यानच हा भूकंप घडवून आणला जाऊ शकतो असा दावा केला जात आहे. सध्याच्या गणितानुसार राज्यसभेच्या सहा पैकी ५ जागा महायुतीच्या आणि १ जागा महाविकास आघाडीची निवडून येऊ शकते. मात्र या निवडणुकीदरम्यान, काँग्रेसचे फुटीर आमदार महायुतीसोबत आल्यास  सगळी समीकरणं बिघडू शकतात. त्यामुळे या निवडणुकीवेळीच हे पक्षांतर होण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेसमधून बाहेर पडण्याच्या तयारीत असलेले हे आमदार नेमके कोण आहेत, याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही.  

Read in English

Web Title: Signs of a political earthquake again in Maharashtra, will so many MLAs of Congress break up? The game will be held during the Rajya Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.