- लोकमत न्यूज नेटवर्कसोलापूर : सध्या संपूर्ण विश्वामध्येच अशांततेचे वातावरण आहे. या स्थितीत शांतता प्रस्थापित व्हायची असेल, तर प्रत्येकाची बुद्धी आणि मन शांत झाले पाहिजे. यासाठी सात्विक विचारांची गरज आहे, असे प्रतिपादन काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी सोमवारी येथे केले.डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात झालेल्या समारंभात काशीपीठाच्या पुरस्कारांचे महास्वामीजींच्या हस्ते वितरण झाले, त्यावेळी ते बोलत होते. महापौर शोभा बनशेट्टी अध्यक्षस्थानी होत्या. ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे (पुणे) यांना बंडय्या मठपती समाजसेवा पुरस्कार, ‘लोकमत’च्या मनुष्यबळ विकास आणि प्रशासन विभागाचे सहाय्यक उपाध्यक्ष बालाजी मुळे (औरंगाबाद) यांना ष. ब्र. परंडकर महाराज पत्रकारिता पुरस्कार, डॉ. शोभा कराळे यांना डॉ. चंद्रशेखर कपाळे साहित्य पुरस्काराने गौरविण्यात आले. रेवणसिद्ध वाडेकर, स्वाती कराळे, उजमाअख्तर मुछाले यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. प्रत्येकी दहा हजार रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्कारांचे स्वरूप होते.
सात्विक विचारांमुळेच होईल शांतता प्रस्थापित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:38 AM