नाशिक : संत निवृत्तीनाथ महाराजांच्या त्र्यंबकेश्वर येथील समाधी संस्थानच्या वैभवात चांदीच्या रथाची आता भर पडली आहे. आतापर्यंत पंढरपूर येथे साध्या रथातून जाणाऱ्या निवृत्तीनाथांची पालखीला आता शुद्ध व संपूर्ण चांदीने बनविलेल्या रथातून जाणार आहे. नाशिक येथील बाफणा ज्वेलर्सने ६० दिवसांमध्ये रथ तयार केला असून, १५ टन वजनाचा २३० किलो चांदीचा रथ रविवारी देवस्थानकडे सुपुर्द केला जाईल. उत्तर महाराष्ट्रातील एकमेव व आगळावेगळा देखणा रथ बंगाली, बनारसी, राजस्थानी व महाराष्ट्रीयन कारागिरांनी तयार केला आहे. धार्मिक कार्य असल्याने ‘ना नफाना तोटा’ तत्त्वावर तयारकेलेल्या रथाच्या निर्मितीसाठी उत्कृष्टतेचा आग्रह धरण्यातआल्याची माहिती बाफणा ज्वेलर्सचे संचालक नीलेश बाफणा यांनी दिली.त्र्यंबकेश्वर येथे २ ते ४ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या निवृत्तीनाथ यात्रेसाठी सज्ज झालेला हारथ शहरात शोभायात्रेद्वारेमिरवून त्र्यंबकेश्वरी रवाना केला जाणार आहे. सागाच्या लाकडापासून रथाचा सांगाडा तयार केला आहे. (प्रतिनिधी)
निवृत्तीनाथांसाठी चांदीचा रथ
By admin | Published: January 30, 2016 1:16 AM