माणगाव (रायगड) : वेटलिफ्टिंगमध्ये राष्ट्रीय स्तरावरील रौप्यपदक विजेत्या वैभवी पाटेकरने कला शाखेच्या प्रथम वर्षात नापास झाल्याने आत्महत्या केली. मंगळवारी रात्री गोरेगाव येथील विष्णू तलावात तिचा मृतदेह सापडला.
वैभवी रिक्षा चालवून घरास हातभार लावत होती. वैभवीला तीन बहिणी आणि एक भाऊ असून मोठ्या बहिणीचे गेल्या वर्षी लग्न झाले आहे. ती आईला व्यवसायात मदत करून, दोशी वकील महाविद्यालयात कला शाखेत शिक्षण घेत होती. तिची आईही वेटलिफ्टर असून, मायलेकींनी सलग २ वर्षे राज्यस्तरावर पॉवरलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. वैभवीला वेटलिफ्टिंगमध्ये राष्ट्रीय स्तरावर रौप्यपदकही प्राप्त झाले आहे. सोमवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास वैभवी घरातून निघून विष्णू तलावाकडे आली. तेथूनच बालमैत्रिणीला, ‘मी माझे जीवन संपवत