शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

चांदी दर पोहोचला नीचांकी पातळीवर

By admin | Published: November 06, 2014 8:56 PM

येत्या काही दिवसांमध्ये हाच भाव २० हजारांच्या घरात येण्याची भीती

हुपरी : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रुड आॅईल आवकही मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. औद्योगिक क्षेत्र आणि नाणी उत्पादकांकडून करण्यात येणाऱ्या मागणीमध्ये प्रचंड घट झाली आहे. या सर्व घडामोडींचा विपरीत परिणाम चांदीच्या भावावर झाल्याने गेल्या पाच वर्षांतील नीचांकी दराचे रेकॉर्ड यावेळी तयार झाले आहे. सन २०१३ मध्ये ऐतिहासिक अशा ७२ हजार प्रतिकिलो भावाचे रेकॉर्ड निर्माण करणारा चांदीचा भाव आज केवळ ३५ हजारांच्या घरात खेळत आहे. येत्या काही दिवसांमध्ये हाच भाव २० हजारांच्या घरात येण्याची भीती आहे.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींचा सर्वांत जास्त परिणाम हा चांदीच्या दरावर होत असतो. संपूर्ण जगभरातील विविध उद्योगांमध्ये प्रतिवर्षी सात हजार ५०० टन चांदी वापरली जाते. धनाढ्य शक्ती व सट्टेबाजारांकडून या संधीचा गैरफायदा उठविण्यासाठी चांदीची संपूर्ण बाजारपेठच हायजॅक करण्याच्या घटना वेळोवेळी घडत असतात. गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांनी जागतिक बाजारपेठेत निर्माण झालेले मंदीचे वातावरण, अमेरिकेची कोलमडलेली अर्थव्यवस्था, डॉलरची झालेली घसरण, औद्योगिक व नाणी उत्पादकांकडून ओसरलेली मागणी या सर्व घटनाक्रमांचा परिणाम चांदीच्या भावावर निश्चितपणे झाल्याने मागील वर्षी असणारा ७२ हजार रुपयांच्या भाव जोरदार घसरू लागला आहे. या भावाने चांदी उद्योगाच्या इतिहासात सर्रास उच्चांकी भाव असे ऐतिहासिक रेकॉर्ड निर्माण केले होते. हाच भाव घसरत घसरत २०१४ च्या सुरुवातीस ५८ हजारांच्या घरात खेळू लागला. टप्प्याटप्प्याने यामध्येही घट होत असून, गेल्या सहा महिन्यांमध्ये चांदीचा भाव ३५ हजारांच्या घरात आल्याचे पाहावयास मिळत आहे. अमेरिकन प्रशासनाने अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी व डॉलरची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत होत असलेली घसरगुंडी थांबविण्यासाठी भरभक्कम अशा पर्यायांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केल्याने शेअरबाजारानेही चांगलीच उसळी मारली आहे. परिणामी शेअरबाजार वधारला जाऊन डॉलरची आपोआप घसरगुंडी थांबली गेली. याचा उलटा परिणाम मात्र क्रुडआॅईलच्या दरावर झाल्याचे पाहावयास मिळत आहे.