मुंबई : ११ आॅगस्ट रोजी रात्री ९ वाजून १३ मिनिटांनी गुरू ग्रह कन्या राशीत गेला असल्याने नाशिक त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभपर्व समाप्त झाले. पुढील सिंहस्थ कुंभपर्व ३१ आॅक्टोबर २०२६ रोजी होणार असून ते त्रिखंडी असल्याचे पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यानी सांगितले.याविषयी माहिती देताना ते म्हणाले की, त्यावेळी गुरू ग्रह वक्री गतीमुळे सिंह राशीतून पुन्हा कर्क राशीत येणार असल्याने असे घडणार आहे. पुढील सिंहस्थ कुंभपर्व ३१ आॅक्टोबर २०२६ ते २५ जानेवारी २०२७, २५ जून २०२७ ते २६ नोव्हेंबर २०२७ आणि २८ फेब्रुवारी २०२८ ते २४ जुलै २०२८ या दरम्यान नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणार आहे.सिंहस्थपर्व पुण्यतम काळ मानला जातो. गंगा, यमुना, भागीरथी, गोदावरी या परमपवित्र नद्या आहेत. कुंभपर्व काळात त्या त्या ठिकाणच्या पवित्र नद्यांमध्ये स्नान तसेच सिंहस्थविधी असे विधी केले जातात. ब्राह्मणभोजन तसेच गोदान, भूमिदान, अन्नदान, उदकदान, कुंभदान यांसह विविध प्रकारच्या दानांचे महत्त्व सांगितले आहे. इसवी पूर्व काळापासून या पर्वाचा इतिहास आहे. वेदांमध्ये, पुराणांत, धर्मग्रथांमध्ये सिंहस्थाचा उल्लेख आहे. (प्रतिनिधी)
सिंहस्थ कुंभपर्व आता २०२६ मध्ये
By admin | Published: August 12, 2016 4:13 AM