-नितीन गव्हाळेअकोला - केंद्र शासनाच्यावतीने संपूर्ण देशामध्ये इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांची भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र विषयातील गुणवत्ता तपासण्याच्या दृष्टिकोनातून नोव्हेंबर २0१७ मध्ये राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (एनएएस) घेण्यात आले होते. या सर्वेक्षणाचा जिल्हानिहाय निकाल जाहीर करण्यात आला असून, यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, अहमदनगरची पोरं हुश्शार ठरली आहेत. विदर्भातील गुणवत्ता मात्रअसमाधानकारक आहे.राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शाळांमध्ये इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीत शिकणाºया विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि त्यांचे विषयांमधील ज्ञान तपासण्यासाठी विद्या प्राधिकरण पुणेमार्फत राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण करण्यात आले होते. जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात आले.इयत्ता तिसरी, पाचवीच्या आणि आठवीच्या ५१ शाळांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. तिसरीतील विद्यार्थ्यांची परिसर अभ्यास (ईव्हीएस), मराठी भाषा, गणित विषयाची चाचणी घेण्यात आली. पाचवीतील मराठी, गणित, तर आठवीतील विद्यार्थ्यांची विज्ञान, मराठी भाषा, गणित आणि सामाजिक शास्त्र विषयातील चाचणी घेण्यात आली.या सर्वेक्षणात सिंधुदुर्ग जिल्ह्याने तिसºया वर्गामध्ये राज्यात प्रथम स्थान पटकावले. त्याखालोखाल रत्नागिरीने दुसरे, सातारा तिसरे अहमदनगरने चौथे, तर सोलापूर जिल्ह्याने पाचवे स्थान पटकावले. सहावे बीड, तर सातवे स्थान गडचिरोली जिल्ह्याने मिळविले.पाचवीच्या सर्वेक्षणात पहिले स्थान रत्नागिरी, दुसरे सिंधुदुर्ग, हिंगोलीने तिसरे, गडचिरोलीने चौथे, बीडने पाचवे, तर उस्मानाबादने सहावे स्थान पटकावले. तसेच आठवीच्या सर्वेक्षणात पहिले स्थान बीड जिल्ह्याने पटकावले. दुसरे सिंधुदुर्ग, तिसरे नंदूरबारने, चौथे बुलडाणाने, पाचवे स्थान हिंगोलीने, तर सहावे गडचिरोली जिल्ह्याने पटकावले.या सर्वेक्षणात गडचिरोली जिल्हा वगळता विदर्भातील एकाही जिल्ह्याने पहिल्या दहामध्ये स्थान मिळविले नाही. यावरून विदर्भातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता घसरत असल्याचे दिसून येते.पहिल्या पाचमधील जिल्ह्यांची टक्केवारीतिस-या वर्गातील सर्वेक्षणात सिंधुदुर्ग जिल्ह्याने एकूण ८२.१७ टक्के गुणप्राप्त केले. रत्नागिरी ८१.४५, सातारा ८०.३२, नगर ७७.३९, बीड ७६,७४, सोलापूर ७६.३४ आणि गडचिरोली जिल्ह्याचा ७१.१५ टक्के निकाल लागला
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, नगरची पोरं हुश्शार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 3:52 AM