ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - ज्येष्ठ गायक अरूण दाते यांचा धाकटा मुलगा संगीत दाते यांचे निधन झाले. सायन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
संगीत दाते यांच्या नशिबी आलेले रस्त्यावरील जीणं यावर ‘लोकमत’ने सर्व प्रथम प्रकाश टाकला होता. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी संगीत यांना उपचारासाठी तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. विविध क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे केले. काही दिवसांपूर्वी त्यांना उपचारांसाठी सायन रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र उपचारांदरम्यान आज सकाळी त्यांची प्राण ज्योत मालवली.
संगीत दाते यांच्या नशिबी आलेले रस्त्यावरील जगणं यावर ‘लोकमत’ने सर्व प्रथम प्रकाश टाकला होता. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी संगीत यांना उपचारासाठी तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. विविध क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे केले.
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करण्यास शिकविणारे अरुण दाते यांच्या संगीतला कोणीतरी वाकडच्या पुलाजवळ सोडले होते. पत्नीचा घटस्फोट व कुटुंबियांने झिडकारल्याने त्यांच्यावर भिका-याचं जीणं जगण्याची वेळ आली होती. त्यांना अनेक व्याधींनी ग्रासले होते, तसेच अर्धांगवायूही झाला होता. त्याविषयीचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर हिंजवडी ठाण्याचे उप निरीक्षक अमोल धस आणि त्यांच्या कर्मचा:यांनी संगीत यांना तातडीने औंध रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर ससून रुग्णालयातील वार्ड क्रमांक 14 मध्ये संगीत यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. विविध वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी दाते यांच्याभोवती गराडा घातला. सोमवारी दिवसभर वृत्तवाहिन्यांवरून संगीत यांची मुलाखत दाखविण्यात येत होती. काही दिवसांनी पुढील उपचारांसाठी त्यांना सायन रुग्णालयात हलववण्यात आले होते. तेथेच उपचारांदरम्यान आज सकाळी त्यांची प्राण ज्योत मालवली.
हृदयनाथ मंगेशकर झाले होते व्यथित
पंडित हृदयनाथ मंगेशकर हे ‘लोकमत’ची बातमी वाचून व्यथीत झाले. त्यांनी तात्काळ संगीतकार सलील कुलकर्णी यांना दूरध्वनीवरून संगीत दाते यांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल कारण्यास सांगितले होते.