पुणे : 'जाता पंढरीसी सुख वाटे जीवा...' हा आनंद लुटण्यासाठी लाखो वारकरी गेली सातशे वर्षे पंढरीची वारी करतात. यंदा महामारीमुळे महाराष्ट्राच्या या परंपेरवर गंडांतर आले; पण ही उणीव भरून निघणार ‘लोकमत’च्या ‘अभंगरंग’ या लाईव्ह कार्यक्रमातून. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच मंगळवारी (३० जून) संध्याकाळी साडे पाच वाजता राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक महेश काळे अभंगवाणीतून भक्तीचा मळा फुलवणार आहेत. लोकमत माध्यम समूह आयोजित आणि संतोष बारणे (सिल्वर ग्रुप) प्रस्तुत हा वेबिनार द आराहना रोझरी फाउंडेशन पुणे यांच्या सहयोगाने होणार आहे.महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंग-रखमाईला भेटण्यासाठी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांचे पालखी सोहळे मंगळवारी प्रस्थान ठेवणार आहेत. त्याच वेळी ‘लोकमत’च्या वेबिनारमध्ये टाळ-मृदंगांसह स्वरांचा गजर होणार आहे. एरवी पंढरीचे वाळवंट वारकऱ्यांनी फुलून जाते. विठूरायाच्या गजराने पंढरी दुमदुमते. वैष्णवांचा तोच मेळा लोकमत वेबिनारच्या माध्यमातून जगभर ऑनलाइन रंगणार आहे. जगभराच्या मराठी मनांना या संगीतमय वारीत सहभागी होऊन घरबसल्या पंढरीचे सुख अनुभवता येणार आहे.
अभंगांच्या दिंडीत स्वरांची पालखीबोलावा विठ्ठल, विष्णुमय जग, जाता पंढरीसी, संतभार पंढरीत, अबीर गुलाल यासारखे सुंदर अभंग महेश काळे यांच्या कसलेल्या गायकीतून ऐकता येणार आहेत. तेव्हा विसरू नका येता मंगळवार (३० जून). या दिवशी संध्याकाळी साडेपाच वाजता लोकमत फेसबुक आणि लोकमत यू-ट्यूब चॅनलवरून लाईव्ह प्रसारणाचा आनंद घ्या.इथे पाहता येईल लाईव्ह प्रसारणयूट्यूबवरून पाहण्यासाठी क्लिक करा http://www.youtube.com/LokmatBhaktiफेसबुकवरून पाहण्यासाठी क्लिक करा https://bit.ly/Lokmat_AbhangRang