शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
3
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
4
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
5
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
6
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
7
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
9
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
10
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
11
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
12
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
13
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
15
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
16
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
17
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
19
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
20
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी

गायक सोनू निगमने मुंडण करून दिले धमकीला सडेतोड उत्तर

By admin | Published: April 20, 2017 6:07 AM

मशिदीवरील भोंग्यांवरून होणाऱ्या अजानबाबत वादग्रस्त टिष्ट्वट करून चर्चेत आलेल्या गायक सोनू निगमने, एका मुस्लीम मित्राकडून मुंडण करून घेत

मुंबई: मशिदीवरील भोंग्यांवरून होणाऱ्या अजानबाबत वादग्रस्त टिष्ट्वट करून चर्चेत आलेल्या गायक सोनू निगमने, एका मुस्लीम मित्राकडून मुंडण करून घेत, मुस्लीम नेत्याने दिलेल्या धमकीला सडेतोड उत्तर दिले आहे. माझ्या टिष्ट्वटचा चुकीचा अर्थ लावण्यात आला असून, कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता, असेही त्याने स्पष्ट केले. मशिदीवरील भोंग्याद्वारे होणाऱ्या अजानवर आक्षेप नोंदविणारे टिष्ट्वट सोनू निगमने १७ एप्रिल रोजी केले होते. त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. पश्चिम बंगालमधील अल्पसंख्याक युनायटेड काउंसिलचे उपाध्यक्ष सय्यद शाह आतेफ अली कादरी यांनी तर निगमविरोधात इशारा देऊन, सोनू निगमचे मुंडण करून त्याला जुन्या चपलांचा हार घालणाऱ्याला १० लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. सामाजिक कार्यकर्ते अन्वर शेख यांनी पुण्यात सोनूविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यामुळे सोनू निगमला संरक्षण देण्यात आले. बुधवारी सोनू निगमने पत्रकार परिषद घेत बाजू मांडली. ज्या व्यक्तीने संपूर्ण आयुष्यात मोहम्मद रफी यांना वडील मानले, ज्याच्या गुरूचे नाव उस्ताद गुलाम मुस्तफा खान आहे, तो मुस्लीमविरोधी कसा असू शकतो, असा सवाल त्याने केला.प्रत्येकाला मते मांडण्याचा अधिकार आहे. आपल्या भावनांचा व टिष्ट्वटचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. अजानला नव्हे, तर मशिदीवर कर्कश्श आवाजात वाजणाऱ्या लाउडस्पीकरला माझा विरोध आहे, पण याचा चुकीचा अर्थ लावला. लोक धार्मिक उत्सवाच्या नावाखाली रस्त्यावर उतरतात. मिरवणुकीत गाणे मोठ्या आवाजात वाजवितात, मद्य सेवन करून जनतेला त्रास देतात, असेही सोनू म्हणाला. नेमके काय होते टिष्ट्वट?‘मी मुस्लीम नाही, तरीही रोज सकाळी अजानमुळे माझी झोपमोड का? ही बळजबरी कधी थांबणार?’ असा सवाल सोनू निगमने टिष्ट्वटरवर केला होता.धमकीला उत्तरसोनू निगमने आपला मित्र हकिम आलीम याच्याकडून आपले केस कापून घेत, मुस्लीम नेते सय्यद कादरी यांना जशास तसे उत्तर दिले. कादरी यांनी आता दहा लाख रुपये तयार ठेवावेत, असे आवाहनही केले. त्यावर कादरी यांनी उत्तर दिले असून, सोनू निगमला जुन्या चपलांचा हार घालून रस्त्यांवरून फिरविणाऱ्यांना दहा लाखांचे बक्षीस दिले जाईल, असे म्हटले आहे.