शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

ठाण्यातील ‘सिंघम’ संजीव जयस्वाल

By admin | Published: May 13, 2017 2:13 AM

महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल कठोर प्रशासक आहेतच, पण प्रशासनावर कुणी हात उगारला तर ते सिंघमसारखे दबंग होऊ शकतात,

संदीप प्रधान। लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल कठोर प्रशासक आहेतच, पण प्रशासनावर कुणी हात उगारला तर ते सिंघमसारखे दबंग होऊ शकतात, याची प्रचीती गुरुवारी ठाणेकरांना आली. अडेलतट्टू व्यापाऱ्यांना त्यांनी यापूर्वी वठणीवर आणलेच. आता बेशिस्त फेरीवाले व मुजोर रिक्षाचालकांचे कंबरडे मोडण्याची हिंमत जयस्वाल यांनी दाखवली आणि त्याला पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची साथ लाभली, तर ठाणेकर या दोघांना निश्चित दुवा देतील.महापालिका उपायुक्त संदीप माळवी हे बुधवारी फेरीवाल्यांवर कारवाई करायला गेले असताना फेरीवाल्यांच्या रूपातील काही गुंडांनी त्यांना बेदम मारहाण केली. माळवी यांच्यावर हात उचलणे, म्हणजे प्रशासनावर हात उगारण्यासारखे असल्याने जयस्वाल आक्रमक झाले आणि त्यांनी गावदेवी येथील गाळेधारक व फेरीवाले यांना इंगा दाखवला. ठाण्यातील रिक्षाचालक तर मुजोरीचा कळस आहे. रिक्षाचालकांवरही सिंघमसारखे तुटून पडलेल्या जयस्वाल यांच्यावर ठाणेकर मनापासून खूश झाले आहेत.जुन्या ठाण्यातील रस्ते अरुंद असून सध्या या परिसरातील वाहतूक प्रचंड वाढली आहे. अनेक दुकानदार, हॉटेल, बार यांनी रस्त्यांवर बिनदिक्कतपणे अतिक्रमण करून रस्ते रुंदीकरणात वर्षानुवर्षे खोडा घातला होता. जयस्वाल यांनी अल्पावधीत २०० ते २५० दुकानदारांची अतिक्रमणे जमीनदोस्त केली. यामुळे खवळलेल्या दुकानदारांनी महापालिकेशी असहकार केला. मात्र जयस्वाल हे वेळप्रसंगी वज्राहून कठोर होऊ शकतात, हे लक्षात आल्यावर यांच्यात समेट घडून आला. जयस्वाल यांनी मोकळे व रुंद केलेले रस्ते फेरीवाल्यांनी काबीज केले आणि पालिकेच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला. १९६०-७० च्या दशकात बेरोजगार मराठी मुलांना रोजगार मिळावा, याकरिता शिवसेनेनेच फेरीवाला संस्कृती पोसली. त्या वेळी फेरीवाले व वडापावच्या गाड्यांवर कारवाई करणाऱ्या गो.रा. खैरनार यांनाही शिवसेनेकडून विरोध झाला होता. ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेला बहुमत प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाचे खच्चीकरण केले जात असल्याचे जयस्वाल यांनी केलेले सूतोवाच बोलके आहे. कालांतराने फेरीवाला ही गरज न राहता धंदा झाला व माफियांनी या धंद्यावर कब्जा केला. वेगवेगळ्या शहरांमधील रस्त्यांचे या माफियांनी वेगवेगळे दर निश्चित केले आहेत. त्यावर, फेरीचा व्यवसाय करण्याकरिता स्थानिक राजकारणी, गुंड यांना हप्ता द्यावा लागतो. फेरीचा व्यवसाय करू दिला जावा, याकरिता हे माफिया महापालिका कर्मचाऱ्यांना हप्ता देतात. त्यामुळे कारवाई होत नाही. रिक्षा व्यवसायाचेही तेच आहे. गरीब तरुणांच्या रोजगाराकरिता रिक्षा परवाने दिले गेले. मात्र, आता हा व्यवसायदेखील माफियांनी गिळला आहे. अनेक स्थानिक राजकारणी, वाहतूक पोलीस, आरटीओ अधिकारी, गुंड यांनी आपला अवैध पैसा रिक्षा धंद्यात गुंतवला आहे. त्यांनी या रिक्षा अत्यल्प मोबदला देऊन चालवायला दिल्या आहेत. रिक्षा चालवणारे चक्क गुंडगिरी करतात. जयस्वाल यांनी परमबीर यांच्या सहकार्याने या मुजोर फेरीवाले व रिक्षावाल्यांचे कंबरडे मोडणे गरजेचे आहे. मात्र कारवाई करताना अधिकृत गाळेधारकांवर कारवाई केल्याने त्याला खीळ बसणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल.