पुणे : संधी मिळाल्यास वय, जात, भाषा, प्रांत, लिंग व धर्म या सर्व भेदांवर मात केली जाऊ शकते. जगात असे कोणतेही क्षेत्र नाही की त्यात आपण ऐतिहासिक कामगिरी करू शकत नाही. संधी मिळाल्याने मी पहिल्याच प्रयत्नात मोहिमेवर उणे ३५ अंश सेल्सिअस तापमान असताना माझ्या मार्गात ६ मृतदेह पडलेले दिसले. तरीही मी विचलित न होता ध्येयाशी एकनिष्ठ राहून ५२ दिवसांत सुमारे २९ हजार फुटांवरील एव्हरेस्ट शिखर गाठू शकले, असे प्रतिपादन वयाच्या १३व्या वर्षी एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करणाऱ्या मालवथा पूर्णा हिने व्यक्त केले.एव्हरेस्ट सर केल्यानिमित्त गिर्यारोहक मालवथ हिचा सत्कार सोहळा पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आला होता. सत्काराला उत्तर देताना ती बोलत हाती. या वेळी पुण्याचे बिशप रेव्हरंड डॉ. थॉमस डाबरे, बार्टीचे महासंचालक राजेश डाबरे, प्रतापराव बोर्डे, अविचल धिवार, मिलिंद जाधव, जी. टी. रोकडे, पी. जे. रंगारी आदी उपस्थित होते.डाबरे म्हणाले, ‘‘वयाच्या १३व्या वर्षी एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करुन मालवथा पूर्णा या भारतीय मुलीने जागतिक विक्रम नोंदवला. परदेशातील गिर्यारोहकांच्या कामगिरीबद्दल चर्चा करण्याऐवजी ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या मालवथचा आपण सन्मान केला पाहिजे, तिच्या कर्तृत्वाचा भारतीयांनी अभिमान बाळगला पाहिजे. या मुलीने एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकावून त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ठेवली. आंबेडकरांनी समान संधी आणि समतेचा विचार आज देशात प्रस्थापित होऊ लागला आहे.’प्रतापराव बोर्डे म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चवदार तळ्याचे आंदोलन करून या देशात समान संधीच्या चळवळीचा प्रारंभ केला. त्यांच्या या आंदोलनामुळे आज सर्व क्षेत्रांमध्ये बहुजन समाज प्रगती करुन जागतिक स्तरावर स्पर्धा करून सर्वोच्च स्थान मिळवत आहे. मालवथ पूर्णा हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.’अविचल धिवार यांनी सूत्रसंचालन केले. विजय धिवार यांनी सूत्रसंचालन केले. मिलिंद जाधव यांनी आभार मानले.परदेशातील गिर्यारोहकांच्या कामगिरीबद्दल चर्चा करण्याऐवजी ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या मालवथचा आपण सन्मान केला पाहिजे, तिच्या कर्तृत्वाचा भारतीयांनी अभिमान बाळगला पाहिजे. या मुलीने एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकावून त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ठेवली. आंबेडकरांनी समान संधी आणि समतेचा विचार आज देशात प्रस्थापित होऊ लागला आहे, असे म्हणून डाबरे यांनी मालवथा पूर्णा यांचा गौरव केला.
ध्येयाशी एकनिष्ठ राहून एव्हरेस्ट केले सर
By admin | Published: May 30, 2016 1:28 AM