शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
2
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
3
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
4
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
5
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
6
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
7
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
8
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
9
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
10
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
11
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
12
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार
13
अक्षय शिंदे मेला की मारला..? न्याय मिळाला की नाही..?
14
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
15
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
16
फेका’फेक’ थांबवण्याचा ‘लोकशाही’ मार्ग
17
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
18
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
19
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
20
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान

बसस्थानकाला समस्यांचा वेढा

By admin | Published: May 21, 2016 1:31 AM

एसटी स्थानक खड्ड्यांनी भरले असून, अतिक्रमणांनी घेरले आहे. ते बेकायदा पार्किंगचे हक्काचे ठिकाण झाले आहे.

राजगुरुनगर : एसटी स्थानक खड्ड्यांनी भरले असून, अतिक्रमणांनी घेरले आहे. ते बेकायदा पार्किंगचे हक्काचे ठिकाण झाले आहे. संरक्षक भिंत नसल्याने हे स्थानक म्हणजे ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी त्याची अवस्था झाली आहे. राजगुरुनगरला प्रशस्त एसटी स्थानक आणि आगार आहे. सुमारे अडीच एकर जागेवर ते वसले आहे. पण सध्या त्याची दुरवस्था झाली असून, डांबर ठिकठिकाणी उखडले आहे. त्यामुळे सर्वत्र चढ-उतार तयार झाले आहेत. एसटी राजगुरुनगर स्थानकात आली की आपटायला आणि हिंदकळायला सुरुवात होते. राजगुरुनगर आले हे समजण्यासाठी ही व्यवस्था केल्याचा विनोद त्यामुळे येथे प्रचलित आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. ते बुजवण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. थोडीफार डागडुजी केली जाते, पण ते पुन्हा उखडतात. स्थानकात असलेल्या स्वच्छतागृह आणि सर्विसिंग सेंटरचे पाणी जाण्याची व्यवस्था दोषपूर्ण असल्याने काही ठिकाणी पाणी साचून ते पुणे-नाशिक महामार्गापर्यंत जाते. तसेच त्यामळे खड्डे तयार होतात. म्हणून त्या पाईपलाईनचे नूतनीकरण आवश्यक आहे. जास्त उत्पन्नासाठी एसटीने अनेक स्टोल्स दिले आहेत. पण त्यांचे नियोजन नसल्याने ते एका रांगेत दिलेले नाहीत. या स्टोल्सवर बाहेरच्या ग्राहकांची गर्दी होत असल्याने एसटी येण्याजाण्यास तसेच प्रवाशांना त्रास होतो. अनेक ग्राहक या स्टॉल्सबाहेर दुचाकी लावून उभे असतात. सुलभ शौचालय मध्यभागी बांधून ठेवले असल्याने एसटी येण्याजाण्यास कमी जागा शिल्लक राहते. हे स्टोल्स, शौचालय, ‘पे आणि पार्क’साठी जागा, अनावश्यक चौथरा, जाहिरातीचे फलक, बेकायदा पार्किंग केलेल्या गाड्या यामुळे स्थानकाची मोठी जागा असूनही येथे खूप गर्दी झाली आहे. त्यामुळे अस्वच्छता वाढली आहे. सगळीकडे कचरा आणि प्लॅस्टिक कचरा पाहावयास मिळतो. या सर्व गर्दीत एसटी गाड्यांना कमी जागा शिल्लक राहते. त्यामुळे प्रवासी आणि चालकांची तारांबळ उडते. आगाराच्या दुरुस्तीसाठी ८० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यातून कंपाउंड, इमारतीची डागडुजी, पाणीपुरवठा, विश्रांतीगृह, आसने आणि डांबरीकरण इत्यादी कामे करण्यात येणार असल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी जाहीर केले होते. पण कामाबाबत अद्यापही प्रगती झालेली नाही.