शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर मला फासावर लटकवा, जयच्या मृत्यूचं राजकारण करू नका; अमोल मिटकरींचं मोठं विधान
2
यंदाच्या निवडणुकीतून राज्यात किती जणींना मिळणार आमदार होण्याची संधी? २०१९ मध्ये २४ महिलांना मिळाली आमदारकी
3
मुंबईतील 'या' म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश
4
मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीत तीन नावे; भाजपाकडून कोणाचे नाव?
5
‘वर्क वेल’ बनली जिल्हा बँकांची ‘लाडकी कंपनी’ सहकारातील भरतीचा घोळ; बँक म्हणते, ‘निविदा भरा’
6
बिहारमधील नवादा येथे गावगुंडांचा धुमाकूळ, गोळीबारानंतर दलितांची ८० घरं जाळली, मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात
7
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
8
तुम्ही Tupperware नाव ऐकलंच असेल! ₹५८६० कोटींचं कर्ज; कंपनी झाली दिवाळखोर, कारण काय?
9
किरण रावनं टाकलं आमिर खानच्या पावलांवर पाऊल, 'लापता लेडीज' आता या देशात वाजणार डंका
10
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव; शेतकऱ्यांबद्दल काय म्हणाले?
11
हिमेश रेशमियाला पितृशोक, गायकाच्या वडिलांचं ८७व्या वर्षी निधन
12
US Fedral Reserve नं कमी केले व्याजदर, शेअर बाजारात दिसू शकते तेजी; आणखी काय परिणाम होणार
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाण करू नका!
14
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
15
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
16
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
17
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
18
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
19
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
20
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत

देशातील परिस्थिती घातक पण परिवर्तनासाठी अनुकूलही

By admin | Published: January 01, 2015 1:26 AM

सध्या देशात धर्मांध शक्तींनी सत्ता हस्तगत केली आहे. देशातील एकूण परिस्थिती पाहता अतिशय घातक परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु ही प्रतिकूल परिस्थिती जितकी घातक आहे, तितकीच

स्मृती व्याख्यानमाला : माकपा नेते कुमार शिराळकर यांचा विश्वास नागपूर : सध्या देशात धर्मांध शक्तींनी सत्ता हस्तगत केली आहे. देशातील एकूण परिस्थिती पाहता अतिशय घातक परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु ही प्रतिकूल परिस्थिती जितकी घातक आहे, तितकीच ती परिवर्तनाच्या चळवळीसाठी अनुकूल सुद्धा आहे, असा विश्वास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य समितीचे सदस्य कॉ. कुमार शिराळकर यांनी आज येथे व्यक्त केला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीतर्फे बुधवारी हिंदी मोरभवन येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक जिल्हा सचिव कॉ. बी.पी. कश्यप यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची ५० वर्षे’ या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यात ते बोलत होते. पक्षाचे जिल्हा कमिटीचे सदस्य गोपाल दा चॅटर्जी अध्यक्षस्थानी होते. कॉ. शिराळकर यांनी सुरुवातीलाच कम्युनिस्टांच्या १०० वर्षातील जागतिक आंदोलनाचा आढावा सादर केला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची देशात अनेक राज्यात सत्ता होती. परंतु आज परिस्थिती काय आहे. आम्ही कुठे आहोत, याचा विचार करण्याची गरज आहे. आम्ही आमच्या वैचारिकतेशी फारकत घेतल्यानेच ही परिस्थिती ओढावली आहे. त्यामुळेच धर्मांध शक्तींना फोफावता आले, हे आम्ही मान्य करायलाच हवे. आज देशात धर्मांध शक्तींद्वारे जे काही सुरू आहे ते अतिशय धोकादायक आहे. परंतु ही परिस्थिती कितीही घातक असली तरी खचून जाण्याची गरज नाही. याचा ताकदीने मुकाबला करण्यासाठी आम्हालाही आक्रमक व्हावे लागेल. यासाठी आमच्या बोथट झालेल्या राजकीय वैचारिक धारेला पुन्हा-पुन्हा घासून-घासून पूर्ववत करण्याची गरज आहे. त्यासाठी कम्युनिस्टांना पुन्हा समाजात लोकांमध्ये जाऊन काम करावे लागेल. आमच्या नेत्यांनी काही कार्यक्रम दिला आहे. त्यानुसार काम करावे लागेल. शेतकरी, दलित यांचे प्रश्न कायम आहे. त्या प्रश्नावर त्यांच्या शोषणाविरोधातील लढा आपलासा करावा लागेल. भांडवलदारांकडून निसर्गाचेही होणाऱ्या शोषणाविरोधातील लढ्याबाबतही कम्युनिस्टांनाही विचार करावा लागेल. समाजातील परिवर्तनवादी सर्व शक्तींना सोबत घेऊन परिवर्तनाची लढाई लढावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. गोपाल दा चॅटर्जी यांनी अध्यक्षीय भाषणात कम्युनिस्ट चळवळीचा आढावा घेतला. मनोहर मुळे यांनी संचालन केले. (प्रतिनिधी)