भोर : भोर-महाड रोडवरील वेनवडी गावाजवळ खडकावर पिंडीचे आकार व शिवकालीन पाण्याचे टाके आढळले आहे. या ठिकाणी भुयार असण्याची शक्यता आहे. सध्या ७ फुटांपर्यंत खोदकाम झाले असून, पुढील खोदकाम सुरू आहे. वेनवडी (ता. भोर) गावाजवळ महाड-पंढरपूर रोडपासून ५० मीटरवर शिवकालीन टाके किंवा भुयार असण्याची शक्यता होती. त्यामुळे शोधकाम सुरू होते. रविवारी सकाळी वेनवडी गावातील अमित चव्हाण या तरुणाला या पिंडी व टाके दिसले. त्यानंतर वेनवडी गावातील तरुण दिलदार तरुण मंडळ, ग्रामस्थ व शिवभक्त संघटना यांना खडकावर पिंडीचे आकार सापडले असून, खडकात खोदकाम सुरू केले. त्यात त्यांना दगडात बांधकाम असलेले टाकोरे दिसले. त्याला पायऱ्या आहेत. त्याचे सुमारे १० फूट खोदकाम झाले असून, संपूर्ण माती बाहेर काढली. अंधारामुळे खोदकाम थांबले आहे. याच ठिकाणी अजून काही टाक्या सापडण्याची शक्यता शिवभक्त संघटनांनी व्यक्त केली. (वार्ताहर)
वेनवडीजवळ सापडले शिवकालीन टाके
By admin | Published: January 10, 2017 2:20 AM