ऑनलाइन लोकमतनंदुरबार, दि. 18 - बनावट कागदपत्रे सादर करून जिल्ह्यातील २९ उद्योजकांनी तब्बल सहा कोटी तीन लाख १४ हजार ८६२ रुपयांचे अनुदान लाटल्याचा प्रकार उघड झाला आहे. यात जिल्हा उद्योग केंद्रातील तत्कालीन महाव्यवस्थापकासह इतर तीन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. शहर पोलिसात एकुण ३३ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नंदुरबार येथील जिल्हा उद्योग केंद्रात २००१ ते २०१० या कालावधीत नंदुरबार, नवापूर, शहादा व सुरत येथील उद्योजकांनी बनावट कागदपत्रे सादर करून उद्योगासाठी अनुदान मिळविले. त्यासाठी या सर्व उद्योजकांनी संबधीत ग्रामपंचायतींचे खोटे दाखले, जागा मालकांचे, उद्योग परवाणगीचे आणि इतर आवश्यक कागदपत्रे बनावट तयार केले. त्यासाठी त्यांना जिल्हा उद्योग केंद्राचे तत्कालीन महाव्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांचेही सहकार्य लाभले. याप्रकरणी राकेश चित्र्या नाईक व अमर पाडवी यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्याची चौकशी केल्यानंतर हे घबाड उघड झाले.याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे नंदुरबार येथील निरीक्षक किरणकुमार भिमराव खेडेकर यांनी बुधवारी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून जिल्हा उद्योग केंद्राचे तत्कालीन महाव्यवस्थापक सुरूपसिंग पाशा वसावे, सह व्यवस्थापक दामू शंकर पाडवी, उद्योग निरिक्षक विजयकुमार महादेव निफरड व ओंकार गुरुदयाल चव्हाण यांच्यासह उद्योजक अमीत अली मोहम्मदअली मेमन, वली मेमन हबीब मेमन, साहिल रफीक हातगणी, रियाज अहमद रफीक अन्सारी, श्रीमती परवीन अतीन मेमन, कुमारी शिरीन सिद्दीक इराणी, मिनाज मुनाज मेमन, आस्मा अब्दूल रशीद, अब्दूर सरीद अब्दुल रसिद मेमन, शबाना हबीब हातगणी, रफीक सत्तार हातगणी, रुकसाना सिद्दीकी इराणी, यास्मीन हसन इराणी सर्व रा.शहादा. कल्याण जसराज राजपुरोहित, रियाज मजरोद्दीन लखाणी, फैजल फारूख लखाणी सर्व रा.नवापूर, पंकजकुमार कैलास सोमानी, विनीत एस.जैन रा.सुरत.दिलीपकुमार रतिलाल शाह, प्रकाशचंद केवलचंद जैन, कमलेश पारसमल जैन, जितेंद्रभाई चलीयावाला, भरतकुमार बी चलीयावाला, जितेंद्र नथ्थू चौधरी रा.नंदुरबार. विश्वनाथ आत्माराम सूर्यवंशी रा.ठाणेपाडा यांचा समावेश आहे.अनेकजण फरारगुन्हा दाखल होणार असल्याचे समजताच यातील अनेकजण फरार झाले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या नंदुरबार व नाशिक येथील पथकाने नंदुरबार, शहादा व नवापूर येथे चौकशी केली.
बनावट कागदपत्रांद्वारे सहा कोटी लाटले
By admin | Published: January 18, 2017 9:12 PM