शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
2
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
3
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
4
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
5
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
6
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
7
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
8
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
9
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
10
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
11
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
12
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
13
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
14
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
15
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
16
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
17
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
18
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
19
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
20
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात

राज्यातील सहा डॉक्टर लोकसभेवर; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील रुग्णालयांचे प्रश्न संसदेत मांडण्याची अपेक्षा

By संतोष आंधळे | Published: June 08, 2024 6:46 AM

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलनुसार, वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांची राज्यातील संख्या जवळपास एक लाख ८० हजार इतकी आहे.

मुंबई : यंदा राज्यातील मतदारांनी सहा डॉक्टर उमेदवारांना लोकसभेवर निवडून दिले, तर चार डॉक्टरांना घरी बसविले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सात डॉक्टर जिंकले होते. यावेळी ही संख्या घटली असली तरी डॉक्टर खासदारांनी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील रुग्णालये आणि  डॉक्टरांचे प्रश्न संसदेत मांडावेत, अशी अपेक्षा वैद्यकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.    

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलनुसार, वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांची राज्यातील संख्या जवळपास एक लाख ८० हजार इतकी आहे. डॉक्टरांवर होणारे हल्ले आणि मालमत्तेचे नुकसान रोखण्यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा यासाठी अनेक वर्षांपासून डॉक्टरांच्या विविध संघटना आग्रही आहेत. महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी डॉक्टरांवर होणारे हल्ले लक्षात घेऊन कायदे केले आहेत.

मात्र, पोलिसांनाच या कायद्यांबाबत अधिक माहिती नसल्यामुळे हल्लेखोरांवर त्या कायद्यांतील कलमानुसार कारवाई केली जात नसल्याची प्रकरणे राज्यात घडली आहेत. राज्यात सध्या महाराष्ट्र मेडिकेअर सर्व्हिस पर्सन आणि मेडिकेअर सेवा संस्था अधिनियम, २०१० असा कायदा आहे. 

विजयी डॉक्टर उमेदवार १. डॉ. श्रीकांत शिंदे, एमएस ऑर्थो (कल्याण)  २. डॉ. शिवाजी काळगे, नेत्ररोगतज्ज्ञ (लातूर) ३. डॉ. हेमंत सावरा, एमएस ऑर्थो (पालघर) ४. डॉ. अमोल कोल्हे, एमबीबीएस (शिरूर) ५. डॉ. प्रशांत पडोळे, एमबीबीएस (भंडारा-गोंदिया)६. डॉ. शोभा बच्छाव, होमिओपॅथी (धुळे) 

पराभूत डॉक्टर उमेदवार १. डॉ. सुभाष भामरे, कर्करोग तज्ज्ञ (धुळे)  २. डॉ. भारती पवार, एमबीबीएस (दिंडोरी) ३. डॉ. हीना गावित, एमडी- मेडिसिन (नंदुरबार) ४. डॉ. सुजय विखे पाटील, एमसीएच-न्यूरोसर्जरी (अहमदनगर) 

मी जे. जे. रुग्णालयाशी संलग्न ग्रॅण्ट मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी आहे. वैद्यकीय व्यवसाय करताना डॉक्टरांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते याची मला कल्पना आहे. डॉक्टरांवर होणारे हल्ले गंभीर आहेत. त्यामुळे त्यांना सुरक्षित वातावरणात काम करता यावे यासाठी हा प्रश्न संसदेत मांडणार आहे. - डॉ. हेमंत सावरा, खासदार, पालघर

डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी केंद्रीय कायद्याची आवश्यकता लक्षात घेऊन आम्ही अनेक वर्षांपासून त्याची मागणी करत आहोत. ती आता तरी मान्य केली जाईल, अशी अपेक्षा आहे. नवनिर्वाचित खासदारांची भेट घेऊन आम्ही आमच्या मागण्या त्यांच्यापुढे मांडणार आहोत.  - डॉ. गिरीश लाड, अध्यक्ष (मुंबई), इंडियन मेडिकल असोसिएशन 

टॅग्स :lok sabhaलोकसभाmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४doctorडॉक्टर