शहरं
Join us  
Trending Stories
1
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
2
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
3
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
4
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
5
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
6
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
7
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
8
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच
9
पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
10
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
11
सरकारी निधी गैरवापर रोखा, समिती नेमा! राजकीय जाहिरातींप्रकरणी हायकोर्टाचे आदेश
12
‘नोटा’ला नकार : ७५ हजार मतदारांनी निवडला होता ‘नोटा’ चा पर्याय 
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

इराकमध्ये अडकलेले सहा अभियंते अखेर मुंबईकडे रवाना

By admin | Published: June 25, 2014 1:20 AM

इराकमधील दहशतवादी हल्ल्याचा थरार अनुभवलेले मुंबई-पुण्यातील सहा अभियंते अखेर बुधवारी पहाटे सुखरुप भारतात परतणार आहेत.

काम अर्धवट सोडले : बुधवारी पहाटे ४.३० वाजता मुंबई विमानतळावर उतरणारयवतमाळ : इराकमधील दहशतवादी हल्ल्याचा थरार अनुभवलेले मुंबई-पुण्यातील सहा अभियंते अखेर बुधवारी पहाटे सुखरुप भारतात परतणार आहेत. प्रकल्प व्यवस्थापक विजय बळीराम तावडे यांच्या नेतृत्वात हे पथक इराकमध्ये कार्यरत होते. या पथकात मोहम्मद सय्यद अहमद, लियाकत अली, मोहम्मद वाजीद अन्सारी, शमशाद अली, मोहम्मद अलीशर अन्सार यांचा समावेश आहे. त्यातील पाच मुंबईचे तर एक पुण्याचा रहिवासी आहे. बुधवार दि. २५ जून रोजी पहाटे ४.३० वाजता त्यांचे अरेबियन एअर लाईन्सच्या विमानाने मुंबईला आगमन होत आहे. मुले सुखरुप परतणार असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. हे सहाही अभियंते पुण्यातील डॅसेस आयटी इन्फ्रा प्रा.लि. या कंपनीचे अधिकारी आहेत. सदर कंपनीने इराकच्या काबूल शहरात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल निर्मितीचे कंत्राट मिळविले होते. हॉस्पिटलमधील आयटी इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामासाठी या अभियंत्यांना मुंबई-पुण्याहून इराकमध्ये पाठविण्यात आले होते. परंतु दहशतवाद्यांनी ठिकठिकाणी हल्ले केल्याने इराकमध्ये वातावरण असुरक्षित झाले. तेथे सुरू असलेला थरार या अभियंत्यांनी अनुभवला. इराकमध्ये कुणाचाही जीव सुरक्षित नसल्याची जाणीव झाल्याने अखेर कंपनीने त्या सहाही अभियंत्यांना काम अर्धवट सोडून परत बोलविण्याचा निर्णय घेतला. एक्झिट व्हिसाच्या प्रतीक्षेत या अभियंत्यांचा भारतात परतीचा प्रवास आठवडाभर लांबला. मात्र अखेर हे सहाही अभियंते अरेबियन विमानाने नजफ विमानतळावरून मुंबईसाठी रवाना झाले असून २५ जूनला पहाटे ते मुंबईत पोहोचणार आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)