मुंबई : राज्य सरकारने मंगळवारी सहा आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली. नागपूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आचल गोयल या आता मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी असतील. जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित हे आता छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल कर्णवाल या जळगाव जिल्हा परिषदेच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. कवली मेघना या नांदेड जिल्हा परिषदेच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी असतील.
अधिकाऱ्याचे नाव सध्याचे पद बदलीनंतरचे पदआचल गोयल अति. मनपा आयुक्त, नागपूर जिल्हाधिकारी, मुंबई शहरअंकित सीईओ, जळगाव जि. प. सीईओ, छ. संभाजीनगर जि. प.मीनल कर्णवाल सीईओ, नांदेड जि. प. सीईओ, जळगाव जि. प.कवली मेघना सहा. जिल्हाधिकारी, किनवट सीईओ, नांदेड जि. प.करिष्मा नायर सहा. जिल्हाधिकारी, जव्हार अति. मनपा आयुक्त, नाशिकरणजित मोहन यादव सहा. जिल्हाधिकारी, कुरखेड सहा. जिल्हाधिकारी, गडचिरोली