पुणे : ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना मिळाला. मात्र दिब्रिटो यांचे नाव केवळ महाराष्ट्र साहित्य परिषदेनेच नव्हे तर साहित्य महामंडळाच्या अंतर्गत काम करणाऱ्या सहापेक्षा अधिक साहित्य संस्थांनी सुचविले होते. विशेषत: उस्मानाबादच्या निमंत्रक संस्थेने महामंडळाच्या अध्यक्षांना शिफारशीचे पत्र देऊन त्यांच्याच नावाचा आग्रह धरला होता.अखिल भारतीय मराठी साहित्य संंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, कवी ना. धों. महानोर, साहित्यिक सुधीर रसाळ, साहित्यिक रा. रं. बोराडे अशी चार नावे चर्चेत होती. मात्र अचानक फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांचे नाव पुढे आले. साहित्य महामंडळाच्या घटक, संलग्न आणि समाविष्ट संस्थांनी बैठकीत नावाचा प्रस्ताव सादर करण्यापूर्वी १४ सप्टेंबर रोजीच मराठवाडा साहित्य परिषद उस्मानाबाद शाखा या निमंत्रक संस्थेने महामंडळाला पत्र पाठवून दिब्रिटो यांच्या नावाची शिफारस केली होती. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी वाङ्मयीन दृष्ट्या, त्याचबरोबर मानवी मूल्यांचा आग्रह आपल्या लेखनातून आणि आचरणातून अंगीकारणाºया व्यक्तीला संमेलनाध्यक्षपदाचा बहुमान मिळावा. मराठी साहित्यात आमूलाग्र योगदान देणारे लेखक आणि मानवी मूल्यांच्या जाणीवा विकसित व्हाव्यात याकरिता दिब्रिटो यांना अध्यक्षपदावर विराजमान होण्याची संधी द्यावी असे म्हटले आहे.निमंत्रक संस्थेबरोबरच महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, विदर्भ साहित्य संघ नागपूर, कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद गुलबर्गा, छत्तीसगड मराठी साहित्य परिषद विलासपूर, गोमंतक साहित्य सेवक मंडळ गोवा या संस्थांनीही दिब्रिटो यांच्या नावाची साहित्य महामंडळाकडे शिफारस केली होती. निम्यापेक्षा अधिक साहित्य संस्थांनी दिब्रिटो यांचे नाव सुचविल्याने त्यांच्याच नावावर एक मताने शिक्कामोर्तब झाले. तीन वर्षांसाठी महामंडळ मराठवाड्याकडे असल्याने निपष्क्षपाती राहण्यासाठी मराठवाडा साहित्य परिषदेने कोणाचेच नाव सुचिवले नाही.
सहा संस्थांनी सुचविले ‘दिब्रिटो’ यांचे नाव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 3:21 AM