जवखेडे हत्याकांड : आरोपींचा शोध घेण्यात पोलीस अपयशी
पाथर्डी (जि. अहमदनगर) : जवखेडे खालसा येथील दलित हत्याकांडातील आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना अजूनही यश मिळालेले नाही. त्यामुळे घटनेशी संबंधित सहा साक्षीदारांची नार्को चाचणी करण्याची पोलिसांची मागणी न्यायालयाने मान्य केली आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर संबंधितांना वैद्यकीय चाचणीसाठी अहमदाबादला पाठविण्यात आले आहे. जाधव कुटुंबातील तिघांची हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून ते एका विहिरीत टाकण्यात आले होते.
हत्याकांडाला 2क् दिवस उलटल्यानंतरही पोलीस अजून आरोपींर्पयत पोहोचू शकलेले नाहीत. घटनास्थळी पोलिसांना कोणताही पुरावा न मिळाल्याने आरोपींना शोधणो पोलिसांसाठी आव्हानात्मक बनले आह़े पोलिसांनी संबंधित सहा साक्षीदारांची मानसशास्त्रीय, वैज्ञानिक व पॉलीग्राफ चाचणी करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली होती.
ही चाचणी करण्यास हरकत नसल्याचे साक्षीदारांनी न्यायालयात सांगितल़े त्यानंतर प्रथम
वर्ग न्यायाधीश शिवाजी केकाण
यांनी चाचणीस परवानगी दिली. (प्रतिनिधी)
पोलीस सांभाळणार गाई-म्हशी
च्तिहेरी हत्याकांडातील साक्षीदारांच्या नार्को चाचणीवर सोमवारी सुनावणी
सुरू असताना एका साक्षीदाराने माङया घरी गायी-म्हशी आहेत. त्यांची व्यवस्था पाहण्यासाठी पोलिसांनी महिला व पुरुष मजूर नेमावेत, अशी मागणी न्यायालयात केली.
च्त्यावर पोलिसांनी दोन मजूर देण्याचे तसेच गायी-म्हशींची काळजी घेण्याची जबाबदारी स्वीकारली व तसे न्यायालयात सांगितले. त्यामुळे सहाही जणांच्या नार्को चाचणीला न्यायालयाने परवानगी दिली.