शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
2
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
3
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
4
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
6
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
7
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
8
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
10
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
11
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
12
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
13
डोनाल्ड ट्रम्पना आणखी एक मुलगी? पाकिस्तानातल्या तरुणीचा खळबळजनक दावा, Video व्हायरल
14
शाहरुख-अमिताभ यांचे फॅन आहेत डोनाल्ड ट्रम्प! हे दोन बॉलिवूड सिनेमे आवडीने पाहतात
15
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन
17
IPL Auction 2025 : पाकिस्तानची वाट लावणारा IPL च्या लिलावात; अमेरिकेच्या दहा खेळाडूंनी केली नोंदणी
18
'ज्यांच्या घरावर बुलडोझर चालवला, त्यांना २५ लाख रुपये द्या'; सुप्रीम कोर्टाचे योगी सरकारला आदेश
19
"कुणी कुणाचं काहीही चोरलेलं नाही"; राज ठाकरेंच्या टीकेवर अजितदादा म्हणाले, "कधी काय बोलतील..."
20
Priyanka Gandhi : "मी मागे हटणार नाही, तुमच्यासाठी लढेन"; प्रियंका गांधींनी स्वतःला म्हटलं 'योद्धा', भाजपावर टीकास्त्र

सहा वर्षांच्या सावत्र मुलीवर बापाकडून अत्याचार

By admin | Published: July 03, 2017 5:16 PM

सहा वर्षांच्या सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नराधम बापावर रविवारी रात्री शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला

ऑनलाइन लोकमतकोल्हापूर, दि. 3 - ताराबाई पार्क येथील घरी कोणी नसल्याचे पाहून सहा वर्षांच्या सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नराधम बापावर रविवारी रात्री शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संशयित लिहाज लियाकत मुजावर (वय 29, रा. रोटे गल्ली, निपाणीवेस, कागल, जि. कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. संशयित आरोपी हा एका वजनदार राजकीय नेत्याचा जवळचा नातेवाईक असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.पीडित मुलीच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे, माझे 2011 मध्ये पहिले लग्न मुंबई येथील जावेद काझी या युवकाशी झाले. त्यांच्यापासून मुलगी झाली. त्यानंतर कौटुंबिक वादातून दोघांच्यात घटस्फोट झाला. मुलगी माझ्यासोबत राहते. त्यानंतर 2014 मध्ये दुसरे लग्न लिहाज मुजावर याचेसोबत झाले. त्यानंतर मी, मुलगी व पती लिहाज माझ्या आई-वडीलांच्या ताराबाई पार्क येथील घरी राहू लागलो. लिहाज हा कामधंदा काही करीत नसल्याने माझ्या वडीलांनी त्याला व्यवसायासाठी पंचवीस लाख रुपये दिले. परंतू त्याने ते चैनीसाठी खर्च केले. त्यानंतर त्याचेपासून मला मुलगा झाला. माझ्या पहिल्या पतीपासून झालेल्या मुलीला तो सतत शिवीगाळ करीत असे. आठ महिन्यापूर्वी पती लिहाज घराबाहेर गेला असता मुलगी माझ्याजवळ येवून रडू लागली. तिला विश्वासात घेवून विचारपूस केली असता तिने वडील लिहाज हे लैंगिक अत्याचार करीत असल्याचे सांगितले. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली होती. हे ऐकून मला मानसिक धक्काच बसला. माझ्या आईनेही त्याला रंगेहात पकडले. त्यानंतर तो घरातून पळून गेला. या धक्याने माझ्या वडीलांचे निधन झाले. मी दूसऱ्यांदा त्याच्यापासून गरोदर राहिल्याने डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. मी बरी झाल्यानंतर पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांची भेट घेवून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. घटनेचे गांर्भीय लक्षात घेऊन मोहिते यांनी महिला दक्षता विभागाच्या सहायक पोलीस निरीक्षक प्रियांका शेळके यांना चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. शेळके यांनी माझ्या मुलीकडे चौकशी केली असता तिने स्वत:वर घडलेल्या अत्याचाराची माहिती दिली. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी तत्काळ शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक प्रविण चौगुले यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. माझ्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी लिहाज मुलावर याचेवर बलात्कार, बाललैंगिक अत्याचाराखाली गुन्हा दाखल केला आहे. संशयित हा एका राजकीय वजनदार नेत्याचा जवळचा नातेवाईक आहे. त्याने गुन्हा दाखल होवू नये, यासाठी पोलीसांवरही दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. परंतू कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक मोहिते यांनी या घटनेचे गांर्भीय लक्षात घेत तत्काळ गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक तृप्ती देशमुख करीत आहेत.फिर्याद मागे घेण्यासाठी दबाव पोलीसात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी संशयित आरोपी लिहाज मुजावर याने पिडीत मुलीच्या आईवर राजकीय व गुन्हेगारी लोकांकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी मुलीसह दोघांनाही ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.