शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
4
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
5
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
6
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
7
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
8
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
9
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
10
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
11
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
12
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
13
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
14
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
15
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
16
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
17
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
18
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान
19
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
20
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

सोळा हजार लातूरकर करणार देहदान!

By admin | Published: June 12, 2016 3:56 AM

लातूर जिल्ह्यातील श्री सांप्रदाय सेवा समितीच्या १६ हजार सदस्यांनी मरणोत्तर देहादानाचा संकल्प केला असून आतापर्यंत तीन हजार लोकांनी अर्ज भरुन दिले आहेत. गुरुपोर्णिमेदिनी संपूर्ण १६ हजार

- राजकुमार जोंधळे, लातूर

लातूर जिल्ह्यातील श्री सांप्रदाय सेवा समितीच्या १६ हजार सदस्यांनी मरणोत्तर देहादानाचा संकल्प केला असून आतापर्यंत तीन हजार लोकांनी अर्ज भरुन दिले आहेत. गुरुपोर्णिमेदिनी संपूर्ण १६ हजार भरलेले अर्ज वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द केले जाणार आहेत. जगद्गुरु श्री नरेंद्राचार्य महाराज यांचा हा ‘श्री सांप्रदाय’ जिल्ह्यातील बहुतांश गावात पोहोचला आहे. या सांप्रदायाचे जिल्ह्यात पाच लाखांहून अधिक भक्त आहेत. या सांप्रदायाने धर्माला विज्ञानाची जोड देऊन एक नवा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. यापूर्वी या सांप्रदायाने गावा-गावात शालेय साहित्याचे वाटप, रक्तदान, आरोग्य शिबीर, विधवा, परितक्ता महिलांना शिलाई मशिनचे वाटप, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आर्थिक मदत केली होती. यावेळी सांप्रदायाने आपल्या १६ हजार सदस्यांनी देहदानाविषयी माहिती देऊन नोंदणीचे आवाहन केले. आतापर्यंत तीन हजार लोकांनी आपले अर्ज भरुन दिले आहेत. १६ हजार दाते सहज होतील : विठ्ठल पाटील या उपक्रमाविषयी बोलताना सांप्रदायाचे विठ्ठल पाटील म्हणाले की, लातूर जिल्ह्यात श्री सांप्रदाय सेवा समितीचे लाखावर भाविक, भक्त आणि सदस्य आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत तब्बल १६ हजार भाविकांनी आपले देहदान करण्याचा निर्धार केला आहे....हेच अध्यात्माचे मूळ - शुभांगी स्वामी सांप्रदायाच्या महिला समितीच्या प्रमुख शुभांगी स्वामी म्हणाल्या की, धर्म सांगतो की आपला देह सद्गुणांच्या कामी आला पाहीजे. देहदान ही संकल्पना नवी आहे. अनेकांना याबाबत माहिती नाही. आम्ही एकट्या लातूर जिल्ह्यातून १६ हजार जणांचा देहदानाचा संकल्प केला. याला चांगला प्रतिसाद आहे.