पुणे : ‘विशिष्ट खाद्यपदार्थामुळे होतो कोरोना’ हा बनावट व्हिडीओ बनवून तो यू-ट्यूबवर टाकणाऱ्यांचा तपास पुण्याच्या सायबर पोलिसांनी लावला आहे. उत्तर प्रदेशातील एक १६ वर्षांचा मुलगा आणि काकीनाडा येथील ४२ वर्षांची व्यक्ती यांनी हे बनावट व्हिडीओ टाकले होते.मोहम्मद अब्दुल सत्तार (वय ४२, रा़ शहासेबगल्ली, गोदावरी ईस्ट, काकीनाडा, आंध्र प्रदेश) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. घड्याळदुरुस्तीचे दुकान असून, त्याने स्वत:च्या अल कुराण सेईंग या यू-ट्यूब चॅनलवर हा बनावट व्हिडीओ टाकला होता. तो देशभर फिरला. त्यामुळे लोकांनी विशिष्ट खाद्यपदार्थ खाणे बंद केल्याने व्यावसायिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. दुसरा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील बाभानवली बुजूर्ग येथील महिलेच्या मोबाईलवरून अपलोड झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ते सिमकार्ड तिने जवळच्या गावात राहणाºया तिच्या बहिणीच्या १६ वर्षांच्या मुलाला दिले होते. तो मुलगा वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. एक महिन्यापूर्वी कोरोना व्हायरसची लागण विशिष्ट खाद्यपदार्थामुळे होते, असा व्हिडीओ त्याला मिळाला होता. त्याची खातरजमा न करता त्याने स्वत:च्या ‘फाइनटेचसूरज’ नावाच्या स्वत:च्या यू-ट्यूबवर अपलोड केला होता. या महिलेने दिलेल्या मोबाईलचा वापर करीत असल्याचे सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झाले आहे. नोव्हेल कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथून प्रसारित झालेले दोन व्हिडीओ देशभर फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि यू-ट्यूब यावर देशात तसेच राज्यामध्ये विविध अशास्त्रीय अफवा पसरविल्या जात होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांचा व्यवसाय धोक्यात आला. कुक्कुट उत्पादनामुळे कुक्कुट खाद्यनिर्मिती व कुक्कुट उत्पादनामुळे कोरोना विषाणू मानवी आरोग्यास धोका पोहोचवू शकतो, अशा अशास्त्रीय व निराधार अफवा आहेत.
राज्य पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून सायबर पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. न्यायालयाच्या परवानगीने सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तपास केला. उत्तर प्रदेश व काकीनाडा येथून दोन व्हिडीओ प्रसारित झाल्याचे पुढे आले होते. या ठिकाणी पोलिसांनी पथके पाठवून तपास केला. त्यात उत्तर प्रदेशातील १६ वर्षांच्या मुलाने हा व्हिडीओ अपलोड केला होता. हा मुलगा व मोहंमद अब्दुल सत्तार यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र पाठविणार आहे. तसेच अफवा पसरविणाऱ्या इतर आरोपींचा शोध सुरू आहे. त्यांच्याविरुद्ध सायबर पोलीस ठाण्याद्वारे कारवाई करणार असल्याचे सह पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र शिसवे यांनी सांगितले. ......अशास्त्रीय व निराधार अफवा च्विशिष्ट खाद्यपदार्थ उत्पादनामुळे नोव्हेल कोरोना विषाणू मानवी आरोग्यास धोका पोहोचवू शकतो, या पूर्णत: अशास्त्रीय व निराधार अफवा आहेत़ असे पशुसंवर्धन खात्याने घोषित केले आहे. च्पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त शिवाजी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, पो. उ. अनिल डफळ, अजित कुऱ्हे , हर्षल दुसाने, प्रसाद पोतदार यांनी ही कामगिरी केली..........