शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

स्काय बुक ३६० प्रणालीचे महिनाअखेरीस लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 5:52 AM

एव्हिएशन व्यवस्थापन सुधारण्यासाठी ठरणार साहाय्यभूत; विमानतळ, प्रशासनाबाबतची माहिती मिळणार एका क्लिकवर

खलील गिरकर मुंबई : विमानतळ, विमानतळ प्रशासनाबाबत समग्र माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी व हवाई वाहतूक व्यवस्थापनासमोरील विविध आव्हानांचा यशस्वी सामना करण्यासाठी व त्यातून मार्ग काढण्यासाठी स्काय बुक ३६० ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे.जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात या प्रणालीचे लोकार्पण करण्यात येणार आहे. एअरपोर्ट आॅथॉरिटी आॅफ इंडिया (एएआय)ने ही प्रणाली तयार केली आहे.

हवाई वाहतूक हा अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीचा विषय आहे. त्याचे व्यवस्थापन करताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. स्काय बुक ३६० या इंटरप्राईज रिसोर्स प्लॅनिंग (ईआरपी)द्वारे या आव्हानांना यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी साहाय्य मिळेल. यामुळे कामामध्ये अधिक पारदर्शकता येईल, कामाचा वेग वाढेल, कोणती फाईल नेमकी कोणत्या ठिकाणी प्रलंबित आहे, त्यावर कोणता शेरा आहे, याची सर्व माहिती तत्काळ (रिअल टाइम) मिळेल. देशात सर्वप्रथम महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एमएडीसी)मध्ये या प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे, अशी माहिती एअरपोर्ट आॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिली. ही प्रणाली वेबवर आधारित आहे.

अकाउंटिंग, आर्थिक व्यवस्थापन, कार्गो, ग्राउंड हॅण्डलिंग, आर्थिक बाबी, मनुष्यबळ याविषयीची माहिती तसेच इतर क्लिष्ट माहितीचे आदानप्रदान करून समस्येवर मार्ग काढण्यात येईल, असे सांगण्यात आले. एअरपोर्ट आॅथॉरिटी आॅफ इंडियातर्फे देशातील १२९ विमानतळांचे व्यवस्थापन केले जाते व त्यामध्ये ९.६ दशलक्ष चौ. किमी अंतराचा समावेश आहे. ही प्रणाली सुरू झाल्यानंतर एएआयचे सर्व विभाग एकमेकांशी जोडले जातील. यामुळे सध्या उद्भवत असलेल्या त्रुटी, अनियमितता, विलंब टळेल व रिअल टाइम निकाल मिळेल तसेच यामध्ये मानवी हस्तक्षेपही कमी होईल, असा दावा करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेमध्ये याबाबत सप्टेंबर महिन्यात वर्किंग पेपर सादर करण्यात आला आहे. हवाई वाहतूक व्यवस्थापन, कोणत्याही घटनेचा अहवाल, टर्मिनलच्या वापराची माहिती, वाहतुकीची माहिती, आर्थिक माहिती, रोख रकमेचे व्यवस्थापन, महसूल व खर्च या सर्वाची माहिती क्लिकवर मिळेल.ताणतणाव दूर करण्यासाठी मार्गदर्शनग्लोबल एव्हिएशन परिषदेत बुधवारी एअरपोर्ट आॅथॉरिटी आॅफ इंडियाने तयार केलेल्या ‘स्काय फिट’ या मोबाइल अ‍ॅपचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू, राज्यमंत्री जयंत सिन्हा, सचिव राजीव चौबे, सह सचिव डॉ. शेफाली जुनेजा व एएआयचे उप महाव्यवस्थापक चंद्रशेखर तिवारी उपस्थित होते. या अ‍ॅपच्या माध्यमातून हवाई प्रवासाशी संबंधित सर्व व्यक्ती जोडल्या जातील. वैमानिक, हवाई वाहतूक नियंत्रक, प्रवासी, केबिन क्रू, ग्राउंड कर्मचारी आदींना या अ‍ॅपच्या माध्यमातून ताणतणाव कमी करण्यासाठी मार्गदर्शन मिळेल. तंत्रज्ञान व प्राचीन योगा पद्धतीचा मिलाफ यात आहे.

टॅग्स :airplaneविमान