- नितीन अग्रवालनवी दिल्ली : घरोघर नळाने पाणीपुरवठा करण्याचा वायदा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार जोमाने प्रयत्न करीत आहे; परंतु, महाराष्ट्रात या योजनेची गती मंदावली आहे. महाराष्ट्रात नळपाणी योजनेसाठी दिलेल्या निधीचा पुरेपूर उपयोग होत नाही, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.जलशक्ती राज्यमंत्री रतन लाल कटारिया यांनी लोकसभेत सांगितले की, २०२४ पर्यंत घरोघर नळाने पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्राला २०१९-२० या वित्तीय वर्षात ८४७.९७ कोटी रुपयांचा निधी देण्यात आले होते. त्यापैकी ३४५.२८ कोटी रुपये (४० टक्के) खर्च करण्यात आले. २०२१-२२ मध्ये १,८२८.९२ कोटी रुपयांपैकी ४ फेब्रुवारीपर्यंत यापैकी एक चतुर्थांश म्हणजे फक्त ४५७.२३ कोटी रुपये वापरण्यात आले.भाजपचे रामदास तडस यांनी विचारलेल्या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात कटारिया यांनी सांगितले की, प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला नळाने पाणीपुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन सुरू करण्यात आले आहे. यानुसार २०१९ पासून आतापर्यंत ३.३३ कोटी कुटुंबांंना नळपाणी जोडणी देण्यात आल्यानंतर नळपाणी जोडणीधारक ग्रामीण भागातील कुटुंबांची संख्या ६.५६ कोटी झाली अहे.३४.२५ टक्के कुटुंबाला नळाने पाणी देशभरात आजही एकूण १८.९३ कोटी कुटुंबांपैकी फक्त ३४.२५ टक्के कुटुंबांकडे नळपाणी जोडणी आहे. योजना सुरू होण्याआधी ३.२३ कोटी ग्रामीण कुटुंबांकडे नळपाणी जोडणी होती.गोव्यात प्रत्येक घरी नळाने पाणीनळपाणी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला २०२४ पर्यंत नळाने पाणी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. गोवा आणि तेलंगणमध्ये ग्रामीण भागात घरोघरी नळाने पाणी पोहोचविण्याचे काम पूर्ण झालेले आहे.
महाराष्ट्रात नळपाणी योजनेची धीमी गती; केंद्रीय निधी खर्च करण्यात मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2021 5:21 AM