चेतन ननावरे,
मुंबई- मुंबई महानगरपालिकेच्या एफ दक्षिण वॉर्डमधील प्रभाग क्रमांक १९७ अद्यापही पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहे. येथे असलेल्या हजारो झोपडपट्टीवासीयांपर्यंत अद्यापही विकासाचे वारे पोहोचलेले नाहीत. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्विकासाचा मुद्दा यंदा कळीचा ठरेल, यात शंका नाही.वरळी आणि महालक्ष्मी या दोन परिसरांत हा प्रभाग पसरलेला आहे. मरीअम्मानगर, व्ही.पी.नगर, भारतनगर, भय्यासाहेब आंबेडकरनगर, जिजामातानगर, कांबळेनगर, सुभाषनगर, आनंदनगर, स्वामीनगर, माता रमाबाई आंबेडकरनगर, मार्कंडेश्वरनगर, मोतीलाल नेहरूनगर, महात्मा फुलेनगर अशा विविध झोपडपट्ट्यांचा विळखा प्रभागाला बसलेला आहे. राज्य सरकार आणि महापालिका प्रशासन या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करण्यात सपशेल अपयशी ठरल्याने पायाभूत सुविधांची बोंब अद्याप परिसरात ऐकू येते.प्रामुख्याने मराठी, मुस्लीम, दक्षिण भारतीय आणि उत्तर भारतीय मतदारांचे वर्चस्व या विभागात दिसून येते. त्यामुळे एकाच पक्षाला एकगठ्ठा मतदान होण्याची शक्यता कमी आहे. मात्र झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावर अवलंबून असलेल्या पाणी, कचरा आणि आरोग्य या तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर महापालिका निवडणुकीत जोरदार घमासान होण्याची शक्यता आहे. सध्या या ठिकाणी राष्ट्रवादीच्या नगरसेविका आहेत. मात्र झोपडपट्टीचा पुनर्विकास करण्यात अपयशी ठरल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांना याच मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. >कुठे किती झोपड्या?नगराचे नावझोपड्या (अंदाजित)कांबळे-सुभाष-आनंदनगर३,२०० मरीअम्मानगर१,५२०माता रमाबाईनगर१,५००स्वामीनगर१,२००मोतीलाल नेहरू/म. फुलेनगर१,१५०भय्यासाहेब आंबेडकरनगर३७५जिजामातानगर८५०मार्कंडेश्वरनगर८५०भारत नगर१७५व्ही.पी. नगर१००