शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
3
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
4
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
5
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
7
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
8
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
9
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
10
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
11
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
12
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
13
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
14
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
15
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
16
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
17
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
18
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
19
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
20
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा

पुणे जिल्ह्यातील लहान-मोठी २५ धरणं रिकामी

By admin | Published: May 15, 2016 7:37 PM

पुणे जिल्ह्यात लहान-मोठी २५ धरणं असून, ती रिकामी होत आहेत. मे अखेरपर्यंत साठा कसाबसा पुरेल अशी परिस्थिती असून, जूनमध्ये जर पहिल्या आठवड्यात पाऊस पडला नाही तर पाणीटंचाई अधिक गंभीर होणार आहे.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. १५ : पुणे जिल्ह्यात लहान-मोठी २५ धरणं असून, ती रिकामी होत आहेत. मे अखेरपर्यंत साठा कसाबसा पुरेल अशी परिस्थिती असून, जूनमध्ये जर पहिल्या आठवड्यात पाऊस पडला नाही तर पाणीटंचाई अधिक गंभीर होणार आहे. २५ पैकी बहुतांश धरणातील साठा हा वजा झाला असून, यात पिंपळगाव जोगा, माणिकडोह, घोड, नाझरे व उजनीचा समावेश आहे.   कुकडी : अनेक वर्षांत प्रथमच नीचांकी साठानारायणगाव : कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील पाच धरणांमध्ये अवघे २.०३ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. अनेक वर्षांमध्ये प्रथमच डिंभे धरणात फक्त ४१ दलघफू तर  माणिकडोह ० टक्के असा नीचांकी पाणीसाठा राहिला आहे. जर मॉन्सून सक्रिय न झाल्यास पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण होणार असून, त्याचा फटका पुणे, नगर जिल्ह्यांतील सहा तालुक्यांना बसणार आहे.कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या ५ धरणांच्या पाणीसाठ्यावर जुन्नर, आंबेगाव, पारनेर, श्रीगोंदा, करमाळा, कर्जत हे तालुके अवलंबून आहेत. गेल्या महिन्यात पारनेर, श्रीगोंदा, करमाळा, कर्जत या तालुक्यांकरिता २.३ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. ते आवर्तन बंद करण्यात आले असून, पुढील दोन महिन्यांचे नियोजन राहील. हे पाणी पिण्यासाठी राहील तसेच या पाण्यावर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही सुटणार आहे, असे कुकडी पाटबंधारे विभाग क्र. १चे कार्यकारी अभियंता जी. बी. नन्नोर यांनी सांगितले. नीरा देवघर, भाटघर धरणे आटलीभोर : तालुक्यातील नीरा देवघर धरणात फक्त ४ टक्के, तर भाटघर धरणात ९ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत अत्यंत कमी पाणीसाठा राहिला आहे. धरणातील विद्युतनिर्मितीसाठी व पाईपलाईनची देखभाल व दुरुस्तीसाठी धरणातून सुरू असलेला पाणीपुरवठा पाच दिवस बंद राहणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.  मागील चार महिन्यांपासून भाटघर धरणातून ७५० क्युसेक्सने, तर सध्या ३३५ क्युसेक्सने पाणी खाली सोडले आहे. धरण ९ टक्क्यांवर आले आहे. पुढील दोन-तीन दिवस पाणी बंद केले जाणार आहे. चासकमान झपाट्याने खाली...चासकमान : धरणाच्या हुतात्मा राजगुरू जलाशयात ९.७८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. शिरूर व खेड तालुक्यांसाठी १४ दिवसांचे पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुरू आहे. धरणातील जलाशयातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे.  सध्या धरणात पाणीपातळी ६३२.२३ दलघमी, एकूण साठा ४८.१७ दलघमी, उपयुक्त साठा २०.९८ दलघमी असून, ९.७८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. कालव्याला सोडलेल्या आवर्तनामुळे आजूबाजूच्या परिसरातील विहिरींची पाणीपातळी वाढली असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कमी झाला आहे.आसखेड : भामा-आसखेड धरणात २२.१४ टक्के पाणीसाठा असून, गेल्या दोन दिवसांत पाच मिलिमीटर पाऊस धरणक्षेत्रात पडला आहे.                    पाण्याची पातळी ६५६.१० मीटर असून, एकूण साठा ६१.५९७ दलघमी  व  उपयुक्त साठा  ४८.०७५ दलघमी तर वर्षभरात एकूण १००५ मिलिमीटर पाऊस धरण परिसरात झाला.घोड खोरेधरण          पाणीसाठा(%)पिंपळगाव        -७३.८७माणिकडोह        -0.१५येडगाव             १७.९८वडज        ६.५२डिंभे       0.३३घोड       - १0.३२विसापूर        ९.९२भीमाखोरेधरण          पाणीसाठा(%)कळमोडी       २0.७९चासकमान       ९.७८भामा आसखेड      २२.४४वडिवळे       ३५.९७अंद्रा      ५८.७६मुळा-मुठा खोरेधरण          पाणीसाठा(%)पवना        २१.५८कासारसाई      २९.0२मुळशी         १२.२३टेमघर       ४.१८वरसगाव      ५.१२पानशेत      १८.१८खडकवासला    ६४.७४नीरा खोरेधरण          पाणीसाठा(%)गुंजवणी     ८.५८नीरा देवघर     ३.९८भाटघर        ९.२९वीर      ५.७१नाझरे      - १३.९५उजनी    - ४८.0१