मुंबई : मंत्रलयाच्या विस्तारित इमारतीच्या पहिल्या माळ्यावर आज किरकोळ आग लागल्याने कर्मचा:यांची धावपळ उडाली.
पहिल्या माळ्यावर सामाजिक न्याय विभागाचे सचिव आर.डी. शिंदे यांच्या कक्षाबाहेर असलेल्या स्वीच बोर्डातून दुपारी 3.3क्च्या सुमारास अचानक धूर निघाला. धूर कॉरिडॉरमध्ये पसरल्याने काही मिनिटे घबराट निर्माण झाली. मेन स्वीच बंद करण्यात आले आणि पहिल्या माळ्यावरील कार्यालयांत असलेल्या कर्मचा:यांना बाहेर काढण्यात आले.
अग्निशमन दलाचे कर्मचारी तत्काळ पोहोचले. त्यांनी आग विझविली, पण इतर माळ्यांवरील कार्यालयांत आगीची बातमी पसरली. याचा फायदा घेऊन काही कर्मचारी घरी निघून गेले. सांसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पहिल्या माळ्यावर जाऊन आगीची पाहणी केली. मंत्रलयाच्या मुख्य इमारतीचे नूतनीकरण संथगतीने सुरू आहे. तेथे काही दुर्घटना घडली तर आधीपेक्षा जास्त जीवितहानी होईल, असे अधिका:यांचे म्हणणो आहे. आज ज्या ठिकाणी आग लागली त्या विस्तारित इमारतीच्या जागीही नवीन इमारत उभारणो प्रस्तावित आहे. तथापि, मुख्य इमारतीचे नूतनीकरण रखडल्याने विस्तारित इमारतीचे भाग्य अधांतरी आहे. (विशेष प्रतिनिधी)