- डॉ. स्नेहा पळणीटकर
नागरीकरणाच्या पाश्र्वभूमीवर ‘स्मार्ट’ शहरे ही संकल्पना पुढे येऊ लागली आहे. जसजसे नागरीकरण वाढत जाते, शहरे वाढतात तसतशा शहरांच्या पायाभूत सेवा सुविधा, वाहतूक व परिवहन, सार्वजनिक आरोग्यसेवा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, बागा, उद्याने व क्रीडांगण, रस्ते, दिवाबत्ती योजना, परवडणारी घरे, सार्वजनिक सुरक्षा इ.बाबत नागरिकांच्या मागण्या सतत वाढत जातात. लोकांच्या नागरी प्रशासनाकडून अपेक्षा वाढत जातात.
‘स्मार्ट’ शहरांची
व्यवस्थापन पद्धत
1. शहरातील नागरी सेवासुविधा
- सार्वजनिक नागरी सेवासुविधांची आखणी व व्यवस्थापन
- महानगरपालिका/ नगर परिषदा प्रशासन
2. शहरातील नागरिक
- संवेदनशील स्थानिक प्रशासन
- आरोग्य व शिक्षण, सार्वजनिक सुरक्षा
- शासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे वितरीत नागरी सेवासुविधा
3. शहरातील व्यवसाय आखणी
- व्यवसायासाठी पोषक वातावरण व संधी
- व्यवस्थापकीय अडचणी
4. वाहतूक
- वाहने, रेल्वे, पूल बांधणी, सार्वजनिक वाहतूक - बस, मेट्रो, मोनो-रेल इ.
5. दळणवळण
- ब्रॉडबँड, वायरलेस, - फोन (भ्रमणध्वनी) व संगणकाचा वापर
6. पाणीपुरवठा :
- स्वच्छता - सुविधा व व्यवस्थापन, शुद्ध पाण्याचा पुरवठा
- पावसाच्या पाण्याची साठवण व वापर, कच:याचे पुनर्उत्पादन व पुनर्वापर
7. ऊर्जा
- तेल, गॅस, अपारंपरिक ऊर्जा, अणुऊर्जासंबंधी
संवेदनशील शहरे (महिला)
नागरी विभागाचा/ समाजाचा शाश्वत विकास
शुद्ध हवा व पर्यावरण बाबी
आधुनिक आपत्ती व्यवस्थापन
शून्य ऊर्जा इमारती
सामाजिक सुरक्षा
स्वच्छ व हरित शहरे आखणी
वाहतूक व प्रदूषण न करणारी विविध वाहने
हरित इमारत प्रणाली
नागरिकांचा सहयोग व सहभागी प्रशासन
पाणी, स्वच्छता, घन कचरा व्यवस्थापन यांचे आधुनिक तंत्रच्या साहाय्याने व्यवस्थापन
हितघटकांना आधुनिक व्यवस्थापन प्रणाली
संवेदनशील व शाश्वत इमारती
ऊर्जा व्यवस्थापन पद्धती व अपारंपरिक ऊर्जा
ऊर्जा/ इंधन बचत
जीवनमान स्तर नियोजन
नागरी सेवा स्तर मूल्यांकन
शाश्वत कार्यक्रम कार्यान्वयन व व्यवस्थापन
आधुनिक सुयोग्य तंत्रज्ञानाचा वापर
सुरक्षा/ रस्ते व पदपथ दिवाबत्ती
छोटय़ा कुटुंबासाठी व छोटी
व्यापारी संकु ले
सार्वजनिक खाजगी सहयोग
परिणामकारक आरोग्यसेवा आखणी
स्मार्ट शहरासाठी सल्लागार मंडळ दृष्टिकोन तयार करण्यासाठी स्थापित करून तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण/ औद्योगिक प्रवीणता व कौशल्य यांचा वापर करून त्याआधारे लगतच्या समाजाचा जीवनस्तर, दर्जा वाढविणो.
‘डीपीपी’ पद्धतीचा वापर करून पहिली सविस्तर पाहणी व ‘एल आयडी आर’ तंत्रज्ञानाचा वापर करून महानगरपालिकांच्या / नगर परिषदांच्या सेवांमधील तफावत दूर करण्याच्या कामी बहुविध बाजू जाणणा:या संस्थेचा सहभाग घेणो, जागतिक संस्था व तंत्रज्ञान कंपनीचे साहाय्य घेऊन ‘स्मार्ट’ शहरांसाठी प्रमाणके निश्चित करण्यासाठी जागतिक स्तरावरील उत्तम उदाहरणो जाणून घेणो.
शाश्वत ‘स्मार्ट’ शहरांसाठी विविध तंत्रज्ञानाच्या संकल्पनेचा पुरावा दर्शविण्यासाठी विविध परीक्षा कार्यक्रम, विविध तंत्रज्ञानाकरिता सल्लागार तंत्रज्ञान कंपनी यांच्यासमवेत भागीदारी करून ‘अनुभव कें द्र’ प्रात्यक्षिक प्रयोगशाळा स्थापित करता येईल.