मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) वाहक आणि प्रवासी यांच्यात सुट्ट्या पैशांवरून वाद होत होते. वेळप्रसंगी वादाचे रूपांतर हाणामारीतही झाल्याच्या घटना घडल्या आहेत. हे टाळण्यासाठी एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी स्मार्ट कार्ड सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. स्मार्ट कार्डसंबंधी खासगी कंपनीने नुकतेच सादरीकरणदेखील केले आहे. परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या मंत्रालयातील दालनात हे सादरीकरण झाले आहे. मंत्री रावते स्मार्ट सादरीकरणावर समाधानी असल्याचे सूत्रांनी सांगितले.रेल्वे प्रशासनाने लोकल प्रवासांच्या सुविधेसाठी स्मार्ट कार्ड यंत्रणा सुरू केली. अल्पावधीत या यंत्रणेला चांगला प्रतिसाद लाभला. रेल्वेच्या धर्तीवर एसटी प्रशासनाने स्मार्ट कार्ड सुरू करण्याचा निर्णय घेतला. या धर्तीवर स्मार्ट कार्डसाठी कंत्राटदेखील काढण्यात आले आहे. स्मार्ट कार्डवर विशिष्ट रक्कम भरून प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. वाद टाळण्यासाठी स्मार्ट कार्ड चांगला पर्याय असल्याचे अधिकाºयांचे म्हणणे आहे.खासगी कंपनीतर्फे एसटीच्या स्मार्ट कार्डचे सादरीकरण करण्यात आले आहे. सादरीकरण पाहून मंत्री रावते हे समाधानी असल्याचे सूत्रांनी सांगितले. महामंडळाचे सर्व निर्णय हे महामंडळाच्या बैठकीत घेण्यात येतात. परिणामी, पुढील बैठकीत स्मार्ट कार्डला मंजुरी मिळण्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे.
एसटी वाहक-प्रवासी यांच्या वादावर ‘स्मार्ट’ उपाय, स्मार्ट कार्ड सादरीकरणावर दिवाकर रावते समाधानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 5:29 AM