नवाब मलिक हे देशद्रोही आहेत. नवाब यांच्या आरोग्याची चिंता त्यांच्या वकिलाने व्यक्त केली म्हणून त्यांना बेल मिळाली आहे. नवाब मलिक अजित पवार गटात, की शरद पवार गटात आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुस्लिम मतांसाठी अजित पवारांना मलिक सोबत हवे आहेत, अशी टीका शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मांडली.
आमच्या सरकारमध्ये नवाब मलिक बसणार नाहीत ही आमची स्पष्ट भूमिका आहे. नवाब मलिक यांना येण्यास मनाई केली असून ते आलेत. ते हिरोगिरी करत असतील तर ते जेलमध्ये जातील, असे शिरसाट म्हणाले.
याचबरोबर अरुण गवळी हे लढले, लोकांना मारले नाही. परंतू, त्यांना आम्ही महात्मा म्हणत नाही. हे मी नाही तर बाळासाहेब ठाकरे म्हणालेले, असेही शिरसाट म्हणाले. याचबरोबर आदित्य ठाकरे दुबईला शेतकऱ्यांबद्दल चिंता व्यक्त करण्यासाठी गेलेले आहेत. तिथे चिंतन मनन करून काही दिवसात ते येतील, असा टोलाही शिरसाट यांनी लगावला.
राजकारणात या गोष्टीला खूप महत्वाचा आहे. कोण कोणत्या जातीचा, त्याचे समाजाच असलेले वजन मग त्याने त्यासाठी कोणत्याही गोष्टी केल्या की त्याला बाजुला केले जाते. चलता है, म्हणत एक दिवस ते बुकांडी बसते ना. माझा मुस्लिम मतांना विरोध नाहीय. परंतू अशा ज्या प्रवृत्ती आहेत, ज्या समाजाला धरून आपले राजकारण करतात त्याला आमचा विरोध आहे. मी काहीही केले तर माजी जमात मला वाचवते, हा जो प्रकार आहे ते चुकीचा आहे. नवाब मलिकमध्ये काय दिसले? फार मोठा विद्वान आहे, समाजासाठी काही काम केलेला व्यक्ती आहे का? भंगार विकणे, गुंडगिरी करणे, दाऊदसारख्या लोकांशी संबंध ठेवणे, या लोकांना जर महान समजू लागलो तर ज्यांना आपण महान समजतो ते महामानव आणि इतरांचे फोटो काढून यांचे लावावे लागतील, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.