शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
मेल्यावरही फरफट, झोळीतून नेला देह, रस्ताच नसल्याने चार किमी पायपीट, पेणमधील विदारक चित्र
3
"जागतिक महासत्तांच्या यादीत भारत हवा", व्लादिमीर पुतिन यांचं विधान
4
पुरुष टेलर घेऊ शकणार नाही महिलांचे माप, उत्तर प्रदेश महिला आयोगाचा प्रस्ताव
5
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
6
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
7
"काँग्रेसकडून जाती-जातीत भांडण लावण्याचा खतरनाक खेळ, म्हणूनच 'एक है तो सेफ है"', नरेंद्र मोदी यांचा घणाघात
8
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
9
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
10
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
11
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
12
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
13
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
14
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
15
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
17
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
18
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
19
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना

...म्हणून भाजपा फोडाफोडी करतोय, अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 2:51 PM

Uddhav Thackeray Criticize BJP: अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपावर घणाघाती टीका केली आहे. भाजपामध्ये आत्मविश्वास नसल्याने ते फोडाफोडी करत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाण हे भाजपामध्ये प्रवेश करणार असून त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपावर घणाघाती टीका केली आहे. भाजपामध्ये आत्मविश्वास नसल्याने ते फोडाफोडी करत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये जनसंवाद मेळाव्याला संबोधित करताना अशोक चव्हाण यांच्याबाबत उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, अशोक चव्हाणांचं आश्चर्य वाटतं. कालपरवापर्यंत जागावाटपामध्ये हिरीरीने सहभाग घेत होते. मग आज असं अचानक काय घडलं की, अशोक चव्हाण तिकडे जात आहेत, सवाल त्यांनी उपस्थित केला.यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावरही टीका केली. निवडणूक आयोगाने शिवसेना चोराच्या हातात दिली, राष्ट्रवादी काँग्रेसही चोराच्या हातात दिली. आता काँग्रेससुद्धा अशोकरावांच्या हातात देतात की काय हे पाहावे लागेल. कारण हे काहीही करू शकतात. विशेष म्हणजे रोज जे काही दंड थोपटताहेत. बेटकुळ्या तर काय येतच नाहीयेत, बेटकुळ्यासुद्धा भाड्याने घ्याव्या लागत आहेत.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, संसदेमध्ये सुद्धा पंतप्रधानांनी भाषण केलं. अबकी बार एवढे पार, अबकी पार तेवढे पार, मग जर एवढे पार असतील तर मग ही फोडाफोडी का करत आहात. तुमच्यामध्ये आत्मविश्वास नाही आहे. तुम्ही ४०० पार काय, ४० पार पण होणार नाही आहात. म्हणून मग तिकडे नितीश कुमारांना घेतलं जातंय, इकडे अशोक चव्हाणांना घेतलं जातंय. अजित पवारांना घेतलं. शिंदेंना घेतलं. भाजपाने दहा वर्षे जर प्रामाणिकपणे काम केलं असतं, तर ही वेळ आली नसती. सगळी भाडोत्री लोकं घेतली जात आहेत. बाजारबुणगे घेतले जात आहेत आणि ते भाजपामधले निष्ठावंत आज सतरंज्या उचलत आहेत त्यांच्या बोडक्यावर बसवले जात आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

त्यांनी पुढे सांगितले की, काही वर्षांपूर्वी काँग्रेसमुक्त भारत असा भाजपाचा नारा होता. मात्र आता आता एवढे सगळे काँग्रेसवाले घेताहेत की, आता काँग्रेसव्याप्त भाजपा अशी त्यांची परिस्थिती झाली आहे. आणखी काही वर्षांनी असंही होईल की, भाजपाचा अध्यक्षही काँग्रेसमधून आलेला असेल, असा दावाही उद्धव ठाकरे यांनी केला. काँग्रेस काय किंवा इतर कोणतेही पक्ष तुम्ही ज्या पद्धतीने नष्ट करायला निघाला आहात हा नतद्रष्टपणा महाराष्ट्रातील जनता बघतेय, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAshok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपाcongressकाँग्रेस