शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

अबतक छप्पन; हातांनी बोअर मारणारा अवलिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 7:24 PM

शंभर फूटहून अधिक खोलवर खोदले आड; सांगोला तालुक्यातील बलवडीच्या सुपुत्राचा दावा

ठळक मुद्देज्याने आतापर्यंत एक-दोन नाही तर तब्बल अबतक छपन्नपेक्षा जास्त बोअर हातांनी बनवल्या आहेतदत्ता शिंदे यांनी हातांनी बोअर पाडायच्या प्रयोगाला २०११ मध्ये सुरुवात केलीपिण्याच्या पाण्यासाठी वणवण कराव्या लागणाºया बलवडीमधील शेतकरी दत्ताच्या या मानवी बोअरमुळे आता बागायती शेतीची स्वप्ने बघू लागले आहेत

सांगोला : आपण गावोगावी मशीनने बोअर पाडताना नेहमीच पाहतो, मात्र हातांनी बोअर पाडलेले तुम्ही पाहिले आहे का ? असाच एक अवलिया आहे, ज्याने आतापर्यंत एक-दोन नाही तर तब्बल अबतक छपन्नपेक्षा जास्त बोअर हातांनी बनवल्या आहेत आणि तेही अगदी एका मापात.  हा अवलिया आहे बलवडी (ता. सांगोला) गावाचा.

सांगोल्याची ओळखच कायम दुष्काळी तालुका आणि या तालुक्यातील बलवडी गावदेखील पिढ्यान्पिढ्या दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेले़ अशा या बलवडी गावात पिण्याच्या पाण्याची कायम भीषण टंचाई असताना बोअर पाडणेदेखील शेतकºयांच्या आवाक्याबाहेरचे. याचीच जाण असलेल्या दत्ता शिंदे यांनी हातांनी बोअर पाडायच्या प्रयोगाला २०११ मध्ये सुरुवात केली. 

पूर्वीच्या काळी पिण्याच्या पाण्यासाठी लहान लहान आड केले जायचे आणि हीच संकल्पना डोळ्यासमोर ठेवून दत्ताने छोटे दांड्याचे फावडे आणि छोटी कुदळ याचा वापर करीत एकट्यानेच बोअर बनवायला सुरुवात केली. हा बोअर बनवितानादेखील ३ फूट एवढा अतिशय बारीक व्यास धरून त्याने खोदायला सुरुवात केली. हळूहळू त्याच्या प्रयत्नाला यश येऊ लागले आणि अतिशय कमी खर्चात शेतकºयांना हा मानवी बोअर हातांनीच करून देऊ लागला.

मदतीला पत्नी आणि एखादा मजूऱ यांच्या साहाय्याने तो हळूहळू बोअर खोल करीत जाऊ लागला आणि पाहता पाहता चक्क एकाच मापात १०० फुटांपर्यंत तो हे बोअर तयार करू लागला. जसजशी जमिनीच्या पोटात खोदाई करायला लागायची तशी प्रचंड उष्णता, कमी प्राणवायू अशा त्रासाला त्याला तोंड द्यावे लागे. पण आता गेल्या आठ वर्षात दत्ताला याची चांगलीच सवय होऊन गेली़ आज त्याच्या नावावर बलवडी गावात तब्बल ५६ बोअर तयार झाले. घूस जशी बीळ पडत जाते तसंच दत्तादेखील अगदी एका रेषेत खोलपर्यंत हे बोअर तयार करतो़ जमिनीच्या शेवटच्या स्तराला जेव्हा पाणी लागते तेव्हाच त्याच्या चेहºयावर समाधान पसरते.

पिण्याच्या पाण्यासाठी वणवण कराव्या लागणाºया बलवडीमधील शेतकरी दत्ताच्या या मानवी बोअरमुळे आता बागायती शेतीची स्वप्ने बघू लागले आहेत. आपल्या परिस्थितीमुळे जगण्यासाठी जीवावर उदार होऊन दत्ता  करीत असलेल्या या कामामुळे आज बलवडीत त्याच्या बोअरमधील पाण्यामुळे शेततळी भरू लागली आहेत़ त्यामुळे  बलवडी परिसरात डाळिंब बागासह इतर पिके जिवंत राहिली आहेत.

दत्ताने स्वत:च्या हाताखाली अजून ३ जणांना असे हातांनी बोअर पाडायला शिकवले आहे़ आता ही मंडळीदेखील परिसरात अशा पद्धतीचे बोअर खोदत आहेत. 

त्याच बोअरवर भरू लागली शेततळी- आज बलवडीतील डॉ़ अशोक कवडे यांनी दोन महिन्यांपूर्वी खोदलेल्या बोअरमधून आता आपले शेततळे भरून घ्यायला सुरुवात केली आहे. कायम दुष्काळी असलेली माझी जमीन आता बागायती होईल़ बलवडी भागात अनेक शेतकरी दत्तामुळे बागायतदार झाल्याचे ते सांगतात. मशीनने बोअर पाडल्यास शेतकºयाला सव्वा ते दीड लाख खर्च येतो, मात्र हेच काम दत्ता केवळ २५ हजारात करीत असल्याने शेतकºयांना दत्ताचे मानवी बोअर आपले वाटते.

स्वत:च्या शेतातील आड खोदून व्यवसाय करणार बंद- वडिलांच्या आजारासाठी झालेल्या खर्चाची पूर्तता करताना दत्ता शिंदे यांना हे काम शिकावे लागले. सहावी पास, स्वत:जवळ केवळ ७१ गुंठे जमीन, घरी पत्नी आणि मुले यामुळे काय करावे हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यांनी हा आड खोदण्यास सुरुवात केली. त्यावेळी एका आडासाठी पाच ते सहा हजार रुपये मिळायचे. त्यानंतर त्यांनी आसपासच्या गावातून ५६ आड खोदले. आता स्वत:च्या शेतात शेवटचा आड खोदून हा व्यवसाय बंद करण्याचा त्यांचा मानस आहे. कारण या आडात वर खाली करताना दम लागतो आणि त्यामुळे या त्रासाला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर